- अनंत पांडव : ९८२३३७२१२९
तिथीर्वारश्च नक्षत्रं योग- करणमेवच। एतै- पंचभिरंगै- संयुतं पंचांगमुच्यते॥
सूर्योदयापासून सूर्यास्त आणि दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयापर्यंत होणाऱ्या वातावरणातील बदल आणि दिनमान विशेष ते शुभाशुभ दिनमानापर्यंतच्या माहितीचा खजाना पंचांगात आढळतो. जन्मापासून मृत्यूपर्यंत आणि मृत्यूनंतरच्या विधींची माहिती संकलित असलेल्या पंचांगाचे महत्त्व केवळ हिंदू समाजासाठीच नव्हे तर सर्वच समाज घटकांसाठी आहे, घरचा ज्योतिषी अशी ओळख असलेल्या पंचांगाची माहिती विविध अंगांनी, विविध तज्ज्ञांमार्फत देण्याचा हा प्रयत्न..