Maa Durga च्या नावावरून मुलीचं नाव ठेवायचंय? मग ‘ही’ आहेत मॉर्डन पण अर्थपूर्ण नावं

या दुर्गेची Maa Durga अनेक सुंदर नाव आहेत. जी तुम्ही तुमच्या मुलासाठी निवडू शकता. यापैकी काही सुंदर नावं Names आणि त्यांचा अर्थ आम्ही तुम्हाला सांगणार आहोत
मुलींसाठी दुर्गेची नांवे
मुलींसाठी दुर्गेची नांवेEsakal
Updated on

भारतात हिंदू धर्मात घरात मुलगी जन्माला आली म्हणजे लक्ष्मीचं घरी आगमन झालं असं मानतात. अनेकजण तरी देवीच्या Godess एखाद्या रुपाचं नाव आपल्या मुलीचं असावं या इच्छेने मुलीचं नाव ठेवतात. तसचं महिलेला आपण अनेकदा दुर्गेचं रुप मानतो. Names for Girl in marathi Maa Durga Names for Girl Child

या दुर्गेची Maa Durga अनेक सुंदर नाव आहेत. जी तुम्ही तुमच्या मुलासाठी निवडू शकता. यापैकी काही सुंदर नावं Names आणि त्यांचा अर्थ आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. कदाचित या नावांपैकी एक नाव तुम्हाला तुमच्या मुलीसाठी पसंत पडू शकतं. Goddess druga names for baby girl

सुरुवातीलाच आपण 'अ' किंवा A आ अक्षरावरून असलेली दुर्गा मातेची नाव पाहणार आहोत. 

१. एशानी- दुर्गा माता हे शक्तीचं प्रतिक आहे. एशानी हे या शक्तीच्या देवतेचं दुसरं नाव आहे. 

२. अन्विथा- हे दुर्गा मातेचं आणखी एक नाव आहे. याचा अर्थ ज्ञान देणारी देवता असा होतो. 

३. अपराजिता- अपराजिताचा अर्थ असा होतो की जिला नष्ट केलं जाऊ शकतं नाही. 

४. आद्या- दुर्गेला आद्या या नावानेही ओळखलं जातं. याचा अर्थ आद्य म्हणजे प्रथम असा होतो. 

५. अनीका- तुम्ही तुमच्या मुलीसाठी हे काहीसं वेगळं मात्र दुर्गा देवीचं नाव देऊ शकता. अनीका म्हणजेच सुंदर, प्रतिभा आणि सुंदर चेहऱ्याची स्त्री असा होतो. Goddess durga names and meaning 

हे देखिल वाचा-

मुलींसाठी दुर्गेची नांवे
Baby Girl Name : मुलींच्या नावातच झळकेल व्यक्तिमत्व अशी हटके नावं ठेवा, बघा संपूर्ण लीस्ट

ग अक्षरावरुन दुर्गा मातेची नावं 

१. गौरी- गौरी देवी हे दुर्गेचं स्त्री अंग आहे. याचा अर्थ निष्पक्ष असा होतो. गौरी या नावाला गेल्या अनेक वर्षांपासून पसंती दिली जाते. 

२. गौतमी- दुर्गेच्या या नावाचा अर्थ ज्ञान देणारी तसचं अंधकार दूर करणारी असा होतो. 

३. गयाना- गयाना या नावाचा अर्थ 'जो ज्ञानाचं रुप किंवा अवतार आहे' असा होतो. दुर्गा मातेला ब्रह्मांडात सर्वोच्च शक्तीची देवी मानलं जातं.तसचं तिला ब्रह्मांडातील सर्व ज्ञान आणि ज्ञानांची अधिकारी देखील मानलं जातं. 

४. गायत्री- दुर्गा मातेच्या या नावाचा अर्थ वेदांची देवता आणि ‘मोक्ष मंत्र’ असाही आहे.

५. गिरिशा- या नावाचा अर्थ म्हणजे जो पर्वतांवर राज्य करतो असा होतो. 

स अक्षरावरून देवी दुर्गेची नावं

  1. सौम्या- दुर्गा देवीचे हे एक अतिशय सुंदर नाव आहे खरं तर सौम्या या शब्दाचा अर्थच सुंदर असा आहे. 

  2. शक्ती- देवी दुर्गेला राक्षसांचा संहार करणारी शक्तीरुपी देवी मानलं जातं. शक्ती म्हणजेच ताकद, एनर्जी असा होतो. 

  3. साधिका- साधिका म्हणजे सर्व काही साध्य करणारी म्हणजेच मिळवणारी. दुर्गा मातेच्या अनेक नावांपैकी एक साधिका हे नाव आहे.

  4. शैलजा- शैलजा हे नाव दोन संस्कृत शब्दांवरून तयार झालं आहे. शैला म्हणेजच पर्वत आणि ज म्हणजेच जन्म या शब्दातील ज अशी या नावाची फोड आहे. शैलजा हे देखील दुर्गा मातेचं सुंदर नाव आहे. 

    हे देखिल वाचा-

मुलींसाठी दुर्गेची नांवे
Baby Girl Names : तुमच्या आवडत्या ऋतूचं हटके नाव द्या लाडक्या लेकीला

याशिवाय विविध अक्षरांवरून दुर्गा मातेची अतिशय अर्थपूर्ण आणि सुंदर नावं आहेत जी तुम्ही तुमच्या मुलीसाठी निवडू शकता. 

  1. नित्या- नित्या नावाची उत्पती संस्कृत भाषेतून झाली आहे. नित्या या नावाचा अर्थ कायम, सदैव किंवा शाश्वत असा होतं. 

  2. शिवप्रिया- दुर्गा मातेचं हे सुंदर नाव देखील मुलीसाठी योग्य ठरू शकतं. जी भगवान शंकराला म्हणेजच शिवाला प्रिय आहे असा या नावाचा अर्थ आहे. दुर्गा माता हे माता पार्वतीचं रुप आहे आणि माता पार्वती महादेवाला प्रिय होत्या. यामुळेच माता पार्वतीला दुर्गेच्या रुपात शिवप्रिया असंही म्हंटलं जातं. 

  3. बानी- दुर्गा मातेच्या १०८ नावांपैकी एक बानी हे नाव आहे. या नावाचा अर्थ बुद्धी आणि विद्या असा आहे. 

  4. दीत्या- दुर्गा मातेच्या या नावाचा संबंध प्रार्थनेशी आहे. तुम्ही मुलीसाठी हे नाव देखील निवडू शकता. 

  5. नियति- नियति या नावाचा अर्थ देखील सुंदर आहे. नियति म्हणजेच भाग्य, नशीब किंवा सर्वशक्तीशाली असा होतो. हिंदू धर्मात दुर्गा मातेला सर्व शक्तींचं स्वरुप मानलं जातं यासाठीच तिला नियति असंही म्हंटलं जातं. 

या नावांसोबतच तुम्ही माता दुर्गेच्या सुंदर नावांपैकी देवेशी, नंदिनी, अपर्णा, मिनाक्षी, शिलिनी अशा काही सुंदर नावांपैकी एक तुमच्या मुलीसाठी निवडू शकता. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.