Narak Chaturdashi 2023 : आज आहे नरक चतुर्दशी, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि तिथी

धनत्रयोदशी झाल्यावर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी नरक चतुर्दशी साजरी केली जाते.
Narak Chaturdashi 2023
Narak Chaturdashi 2023esakal
Updated on

Narak Chaturdashi 2023 : दिवाळीचा सण आपल्याकडे मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. नुकतीच दिवाळीला सुरूवात झाली असून वसूबारस आणि धनत्रयोदशीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यंदा नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी साजरे केले जाणार आहेत.

नरक चतुर्दशीच्या दिवशी यमराज, काली माता आणि श्रीकृष्णाची आवर्जून पूजा केली जाते. नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे उठून अभ्यंगस्नान केले जाते. ही परंपरा आजही कायम आहे. धनत्रयोदशीचा सण संपल्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी नरक चतुर्दशी साजरी केली जाते. आज नरक चतुर्दशी आहे त्याची तिथी आणि पूजा विधी आपण जाणून घेऊयात.

नरक चतुर्दशी

नरक चतुर्दशी १२ नोव्हेंबरला अर्थात आज साजरी केली जाणार आहे. विशेष म्हणजे नरक चतुर्दशीच्या दिवशी यंदा लक्ष्मीपूजनाचा दिवस ही साजरा केला जाणार आहे. हे दोन्ही दिवस यंदा एकाच दिवशी आले आहेत.

Narak Chaturdashi 2023
Vasubaras 2023 : दिवाळीचा आज पहिला दिवस वसूबारस, जाणून घ्या पूजा करण्याची पद्धत

नरक चतुर्दशीची तिथी आणि शुभ मुहूर्त

नरक चतुर्दशीच्या तिथीची सुरूवात यंदा ११ नोव्हेंबरला म्हणजेच आदल्या दिवशी शनिवारी दुपारी १ वाजून ५७ मिनिटांनी सुरू होणार आहे. मात्र, या तिथीची समाप्ती दुसऱ्या दिवशी १२ नोव्हेंबरला म्हणजेच आज दुपारी २ वाजून ४४ मिनिटांनी होईल.

या वर्षी उदया तिथी आल्यामुळे नरक चतुर्दशी ही १२ नोव्हेंबरला साजरी केली जाईल. नरक चतुर्दशीचा शुभ मुहूर्त सायंकाळी ५ वाजून ३१ मिनिटे ते रात्री ८ वाजून ३६ मिनिटांपर्यंत आहे. या कालावधीमध्ये तुम्ही पूजा करू शकता.

नरक चतुर्दशी पूजा विधी

  • नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे लवकर उठून अभ्यंगस्नान करावे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावे.

  • नरक चतुर्दशीच्या दिवशी भगवान श्रीकृष्ण, यमराज, काली माता, भगवान शिव, हनुमान यांची आराधना केली जाते.

  • शिवाय, या दिवशी भगवान विष्णूंची खास वामन स्वरूपाची पूजा करण्याची पद्धत आहे.

  • या सर्व देवतांची पूजा करून त्यांना निरांजनाने ओवाळा, धूप आणि दिवा लावा, कुंकू वाहा आणि प्रार्थना करा.

Narak Chaturdashi 2023
Dhanteras 2023 : आज आहे धनत्रयोदशी, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजेचे महत्व

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.