Navratri 2023 : आज नवरात्रीचा पहिला दिवस. नवदुर्गांमध्ये शैलपुत्री देवी प्रथम दुर्गा आहे. तिच्या पूजेसाठी पांढऱ्या रंगांच्या फुलांचा वापर केला जातो, असे का? यामागे काही शास्त्र आहे का? चला तर जाणून घेऊया याबाबत सविस्तर.
शैलपुत्री पर्वतराज हिमालय कन्या आहे. नवदुर्गांमध्ये शैलपुत्री प्रथम दुर्गा आहे. हिमालय कन्या असल्यामुळे शैलपुत्री देवीला बर्फाप्रमाणे पांढरा रंग प्रिय आहे. म्हणूनच देवीची पूजा पांढऱ्या रंगाच्या फुलांनी केली जाते.
देवीला पांढऱ्या रंगाचे वस्त्र अर्पण करणे शुभ मानले जाते. तसेच देवीला पांढऱ्या रंगाचा समावेश असलेल्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा, असे सांगितले जाते. शैल म्हणजे पाषाण आणि पाषाणाप्रमाणे ठाम राहण्याची प्रेरणा यातून मिळते, असे म्हटले जाते.
नवरात्रीला घटस्थापनेचा शुभ मुहूर्त सकाळी ६ वाजून २१ मिनिटांपासून ते सकाळी १० वाजून १२ मिनिटांपर्यंत असेल.
असे मानले जाते की शुभ-मुहूर्तावर विधीपूर्वक कलश स्थापना केल्यास घरात सुख, समृद्धी नांदते. कलश कधीही लोखंडी किंवा स्टीलचा नसावा. घटस्थापनेपूर्वी जागा अगदी स्वच्छ पुसून घ्या. त्यानंतर त्या स्वच्छ जागेवर कलश स्थापना करा.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.