Navratri Diet Chart : नवरात्रीला फॉलो करा 'हा' डाएट प्लान, ९ दिवसांत एक किलोसुद्धा वाढणार नाही वजन

काही लोक लठ्ठपणा वाढण्याच्या भितीने पहिल्या आणि शेवटच्या दिवशी उपवास करतात
Navratri Diet Chart
Navratri Diet Chartesakal
Updated on

Navratri Diet Chart : देशभरात १५ ऑक्टोबरपासून नवरात्रीला सुरुवात झाली आहे. या काळात सगळीकडे भक्तीमय वातावरण तुम्हाला दिसून येईल. महिलावर्ग या काळात नऊ दिवस उपवास करतात. तर काही लोक लठ्ठपणा वाढण्याच्या भितीने पहिल्या आणि शेवटच्या दिवशी उपवास करतात.

तुम्हालाही वजन वाढण्याची अशीच काहीशी भिती असेल तर लक्षात घ्या की, योग्य वेळेत योग्य पदार्थ खाल्ल्यास नऊ दिवस उपवास करूनही तुमचे वजन अजिबात वाढणार नाही. लोक उपवासात शाबुदाणा, मखाणा, पनीरचेसुद्धा सेवन करतात. मात्र प्रत्यक्षात हे पदार्थ अनहेल्दी असतात.

शाबुदाणा खिचडी टाळा

आता प्रश्न पडतो की नवरात्रीत असे काय खावे ज्याने तुमचे वजन वाढणार नाही. न्यूट्रिशनिस्ट आणि लाइफस्टाइल एज्युकेटर करिश्मा चावला यांच्या मते, उपवासात खिचडी खाल्ल्यास त्याचे पचन सहज होत नाही. कारण त्यात कॅलरीज जास्त असतात. शिवाय काही लोक नवरात्रीच्या उपवासात उकळलेल्या बटाट्याचे सेवन करतात. ज्यामुळे कॅलरीजचे प्रमाण शरीरात डबल होते. तुम्हाला हे पदार्थ खायचेच असेल तर तुम्ही दिवसाच्या सुरुवातीलाच याचे सेवन करायला हवे.

Navratri Diet Chart
Navratri :जाणून घ्या नऊरात्रीची पूजा आणि घटस्थापना विधींविषयी

न्यूट्रिशनिस्टने तुमच्यासाठी सर्वोत्तम फळांचा आहार सुचवला आहे, जो तुम्ही कुठल्याही अडथळ्याशिवाय पाळू शकता.

नाश्ता - दही एक वाटी. कुट्टू उपमा किंवा राजगिरा चपाती खाऊ शकता.

दुपारी - दुधासह काही फायबरयुक्त फळे जसे सफरचंद, किंवा पपई

संध्याकाळी - बदाम, अक्रोड आणि शेंगदाणे आणि दही

रात्री - तुम्ही दुधी भोपळ्याची खिर किंवा शिरा बनवून खाऊ शकता. शिवाय राजगिऱ्याचा पराठा तुम्ही दुधी भोपळ्याच्या चटणीसह ट्राय करू शकता.

Navratri Diet Chart
Navratri 2023: नवरात्रीच्या उपवासात चुकूनही वांगी अन् या गोष्टींचे सेवन केल्यास होईल...

नवरात्रीला उपवास करताना या टिप्स लक्षात घ्या

कुठलाही पदार्थ तळण्यापेक्षा भाजून खा.

सारखेला पर्यायी पदार्थ वापरा.

शाबुदाणा, मखाणा यांसारखे पदार्थ वजन वाढवतात. तेव्हा याचे सेवन कमी करा.

डेअरी प्रोडक्ट्सचा वापर करा.

उपवासात दिवसभर जास्तीत जास्त पाणी प्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.