Neem Karoli Baba : नीम करोली बाबांना हार-फुलांऐवजी ब्लँकेट का चढवलं जातं? जाणून घ्या

बाबांच्या चमत्काराच्या कहाण्या फार प्रसिद्ध आहेत. पण ब्लँकेट का चढवलं जातं जाणून घ्या.
Neem Karoli Baba
Neem Karoli Babaesakal
Updated on

What Is the Importance Of Giving Blanket To Neem Karoli Baba : मानसशास्त्रज्ञ रिचरिड अल्पर्ट बाबांना भेटल्यावर बाबा रामदास झाले. त्यांनी १९७९मध्ये नीम करोली बाबांच्या चमत्कारांवर एक पुस्तक 'मिरेकल ऑफ लव' लिहिले. त्यात त्यांनी बुलेटप्रुफ ब्लँकेट नावाने एका घटनेचा उल्लेख केला आहे.

बाबा रामदास यांच्या त्या पुस्तकात लिहिलं आहे की, नीम करोली बाबा कायम अंगावर ब्लँकेट पांघरुन असतं. त्यामुळे कैंची धाम आश्रमात जेव्हाही कोणी भक्त जातो तो ब्लँकेट चढवतो. पण १९४३ मध्ये या ब्लँकेटविषयी एक घटना घडली. त्यामुळे एक वृद्ध जोडपं बाबांचे भक्त झालेत, त्यांचं कुटुंब फतेहगडला राहतं.

पुर्ण घटना

यातील कथेनुसार बाबा एखदा त्या वृद्ध जोडप्याच्या घरी पोहचले. त्यांचा मुलगा ब्रिटीश सेनेत होता आणि दुसऱ्या महायुद्धात बर्मा फ्रंटवर होता. त्यांच्या घरी पोहचल्यावर बाबा म्हणाले की, रात्री ते इथेच थांबतील. ते जोडपं खूश तर होतं, पण त्यांच्याकडे महाराजांची सेवा करण्यासाठी काही नव्हतं म्हणून दुःखीही होते.

पण जे काही होतं त्यात त्यांना बाबांचा स्वागत, सत्कार केला. त्यानंतर बाबा एका खाटेवर ब्लँकेट ओढून झोपले. झोपताना त्यांना कोणी डिस्टर्ब करायचं नाही अशी त्यांनी ताकीद दिली होती. मग ते वृद्ध जोडपंही झोपायला गेलं.

Neem Karoli Baba
Neem Karoli Baba : नीम करोली बाबांचा हा चमत्कार तुम्हाला माहितीये? त्यांना रेल्वे कोचमधून उतरवलं अन्...

थोड्यावेळाने बाबा कह्णायला लागले. जोडप्याची झोप उघडली. ते खाटे जवळ बसून राहीले की, बाबांना काय होतय या चिंतेत. त्यांना असं वाटलं ही जस बाबांना कोणी मारत आहे. सकाळी बाबा उठले आणि ब्लँकेट त्या वृद्ध व्यक्तीला देत सांगितलं की, हे गंगेत वाहून टाका. हे उघडून बघायचं नाही. शिवाय जाताना बाबांनी हे पण सांगितलं की, काळजी करू नका महिन्याभरात मुलगा परत येईल.

जेव्हा ते वृद्ध व्यक्ती ब्लँकेट नदीत टाकायला गेले तेव्हा त्यांना जाणवलं की त्यात काही तरी लोखंडी वस्तू आहे. पण बाबांनीतर ते ब्लँकेट त्यांच्या समोरच घडी केलं होतं. पण बाबांच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी ते गंगेत वाहून टाकलं.

Neem Karoli Baba
Neem Karoli Baba : लहान-सहान गोष्टींच लगेच टेन्शन येतं? 'या' उपयांनी रहा टेन्शन फ्री

साधारण एक महिन्यांनी त्या वृद्ध जोडप्याचा मुलगा परतला. फार आनंदी होता. त्यांने किस्सा सांगितला की, एकदा तो शत्रूंनी वेढला गेला होता. रात्रभर गोळीबार झाला. त्याचे सर्व सोबती मारले गेले, पण तो एकटा वाचला. मी कसा वाचलो ते मला माहित नाही.

त्या जपानी सैन्याच्या रात्रभराच्या गोळीबारीत तो जीवंत वाचला. सकाळी जेव्हा अजून ब्रिटीश सैनिक आले तेव्हा त्याच्या जीवात जीव आला. ही तिच रात्र होती जेव्हा बाबा त्यांच्या घरी थांबले होते. भक्तांचं मानणं आहे की, बाबाच त्याची रक्षा करत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.