रोजच्या जगण्यात आपण काही गोष्टींकडे कक्ष देत नाही. पण त्याचा थेट संबंध आपल्या जीवनाशी असतो. शास्त्रात अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत त्याची देवाण घेवाण करू नये. याचा संबंध माणसाच्या भाग्याशी जोडलेला आहे. या गोष्टींची माहितीच नसल्याने नकळतपणे काही अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे उधारी कधी संपतच नाही. एकदा उधारी फेडल्यावरही पुन्हा उधारी चढायला सुरूवात होते.
या ४ वस्तूंची उधारी कधी करू नये
शेजारी, मित्रपरिवार, नातेवाईक यांच्याशी बऱ्याचदा वस्तूंची देवाण घेवाण होते. गरज असेल तसे विनासंकोच वस्तू मागून घेतल्या जातात. पण काही वस्तू अशा असतात त्यांची अशी देवाणघेवाण कधी करू नका नाहीतर घरात पैसा टिकत नाही. घरात नकारात्मकता वाढते.
पेन
शाळा, कॉलेज, ऑफिस, बँक अशा बऱ्याच ठिकाणी तुम्ही पाहिले असेल की, सहजपणे पेन मागितले जातात. असं मानलं जातं की, पेन माणसाच्या चांगल्या-वाईट कर्माचा हिशेब ठेवतो. अशात जर कोणाकडे पेन मागितला तर तो स्वतः जवळ न ठेवता त्यांना परत करा. तसच जर कोणाला पेन दिला तर तो परतही घ्या.
घड्याळ
शास्त्रात असं मानलं जातं की, घडाळ्याशी माणसाच्या चांगल्या वाईट वेळेचा संबंध असतो. म्हणून दुसऱ्याचे घड्याळ घालू नये. असे देवाण घेवाण करण अशुभ मानले जाते.
झाडू
हिंदू धर्मात झाडूला लक्ष्मीचे रूप मानले जाते. धार्मिक शास्त्रांनुसार झाडू कोणालाही उधार देऊ नये. यामुळे घरातली लक्ष्मी निघून जाते. झाडू नेहमी लपवून ठेवावा. कोणालाही दान देऊ नये.
मीठ
घरात जेवण बनवताना मीठ संपले की, लोक शेजारून मागताना दिसतात. पण असे करू नये. शास्त्रात सांगितले आहे की, मीठ उधार कधी देऊ नये कधी घेऊ नये. शिवाय आपल्या हातातून दुसऱ्याच्या हातात देऊ नये. असे म्हणतात की, मीठाचा संबंध चंद्र व शुक्राशी आहे. ज्यामुळे मी उधार दिल्याने दोन्ही ग्रह कमकूवत होतात. म्हणून असे अजिबात करू नये.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.