Raksha Bandhan 2022: बहिण भावाच्या निस्वार्थ प्रेमाचा सण म्हणजे रंक्षाबंधन. यावर्षी रक्षाबंधन येत्या ११ ऑगस्टला असणार आहे. बहिण भाऊ या सणाची आतुरतेने वाट बघत असतात. दरवर्षी हा सण श्रावण मासाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. बाजारात अनेक प्रकारच्या राख्या विकायला असतात. मात्र शास्त्रामध्ये राखीबाबत काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. त्याबाबतची काळजी महत्वाची ठरते. चला तर जाणून घेऊया बहिणीने भावाला राखी बांधताना कोणत्या प्रकारची काळजी घ्यायची ते. (Never tied this type of rakhi to your brother)
रक्षाबंधनाच्या दिवशी शुभ मुहू्र्तावर बहिण भावाला राखी बांधते. राखी बांधत बहिण भावाच्या दिर्घायुष्याची प्रार्थना करते. बहिण भावाच्या प्रेमाचा प्रतिक असणारा हा महत्वाचा सण वर्षातून एकदाच येतो त्यामुळे राखीच्या सणाबाबत काही गोष्टींची विशेष काळजी घेणं महत्वाचं ठरतं.
अश्या प्रकारच्या राख्या विकत घेऊ नका
बहिणीने राखी घेताना अश्या प्रकारची राखी चुकूनही घेऊ नये ज्यामध्ये अशुभ प्रतिक दर्शवणारे चिन्ह असेल. अश्या प्रकारची राखी अशुभ मानली जाते.
राखीमध्ये देवाचा फोटो नसावा
राखीमध्ये देवी देवतेचा फोटो नसावा. त्याचं कारण असं की बहिणीने भावाला बांधलेली राखी दीर्घकाळ असते. अशा वेळी राखी कधी कुठे पडली किंवा चुकून हातातून सुटून कुठे पडली तर देवाचा अपमान होतो.
टूटलेली खंडित राखी बांधू नका
राखी विकत घेताना ती तुटलेली किंवा खंडित असेल अशी राखी चुकूनही विकत घेऊ नका. राखीचा एखादा धागा जरी राखीपासून वेगळा झाला असेल तरी ती विकत घेऊ नका. अश्या राख्या अशुभ मानल्या जातात.
काळ्या रंगाची राखी बांधू नका
भावाला कधी काळ्या रंगाची राखी बांधू नका. कारण काळा रंग अशुभ मानला जातो. या रंगाची राखी नकारात्मकता वाढवते. त्यामुळे अश्या रंगाची राखी घेऊ नका.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.