Panchang 15th Oct. : शनिवारी निळे वस्त्र परिधान करा; दिवस शुभ जाणार

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:२४ ते दु.०१:३० या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.
Panchang
Panchang esakal
Updated on

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार

दिनांक १५ ॲाक्टोबर २०२२

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक आश्विन २३ शके १९४४

सूर्योदय ०६:३२ वाजता तर सूर्यास्त १८:०९ वाजता आहे. चंद्रोदय रात्री २२:१९ वाजता आहे. प्रात: संध्या सकाळी ०५:१८ ते ०६:३२ वाजेपर्यंत करावी. सायं संध्या १८:०९ ते १९:२३ या काळात करावी. अपराण्हकाळ १३:३० ते १५:५० दरम्यान असणार आहे. प्रदोषकाळ १८:०९ ते २०ः३८दरम्यान असेल. निशीथ काळ २३:५६ ते २४:४५ वाजेपर्यंत आहे. तर, राहु काळ १३:४७ ते १५:१४ दरम्यान असणार आहे. यमघंट काळ १३:४७ ते १५:१४ आहे.

श्राद्धतिथी षष्ठी श्राद्ध आहे. सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे. कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:२४ ते दु.०१:३० या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. या दिवशी तिळाचे तेल खावू नये. या दिवशी निळे वस्त्र परिधान करावे.

लाभदायक

  • लाभ मुहूर्त-- १३:४७ ते १५:१४

  • अमृत मुहूर्त--  १५:१४ ते १६:४२

  • विजय मुहूर्त— १४:१७ ते १५:०४

पृथ्वीवर अग्निवास नाही. गुरू मुखात आहुती आहे. शिववास भोजनात , काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.

  • शालिवाहन शके -१९४४

  • संवत्सर - शुभकृत्

  • अयन - दक्षिणायन

  • ऋतु - शरद(सौर)

  • मास - आश्विन

  • पक्ष - कृष्ण

  • तिथी - षष्ठी(२९:५१ प.नं. सप्तमी)

  • वार - शनिवार

  • नक्षत्र - मृग(२३:३३ प.नं. आर्द्रा)

  • योग - वरियान(१५:४६ प.नं.परिघ)

  • करण - गरज(१७:०० प.नं. वणिज)

  • चंद्र रास - वृषभ (१०:२४ नं.मिथुन)

  • सूर्य रास - कन्या

  • गुरु रास - मीन

विशेष:- भद्रा २९:५१ नं., रवियोग २३:३३ नं. आहे. या दिवशी पाण्यात दारूहळद वनस्पतीचे चूर्ण टाकून स्नान करावे. शनि वज्रपंजर कवच स्तोत्राचे पठण करावे. ‘शं शनैश्चराय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा. हनुमानास व शनिदेवास खजुराचा नैवेद्य दाखवावा. सत्पात्री व्यक्तीस काळे उडीद दान करावे.

दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना काळे उडीद खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- वृषभ, कर्क, सिंह, वृश्चिक, धनु, मीन या राशिंना स.१०:२४ प. चंद्रबळ अनुकूल आहे.

©️सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)

www.deshpandepanchang.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.