Pandav Panchami : पांडव पंचमी का साजरी केली जाते? आख्यायिका महत्त्व व मान्यता

दिवाळी झाल्यावर, म्हणजेच कार्तिक महिन्यातील पाचव्या दिवशी आपण पांडव पंचमी साजरी करतो.
Pandav Panchami
Pandav PanchamiEsakal
Updated on

दिवाळी झाली की त्याच्या पाचव्या दिवशी म्हणजे कार्तिक महिन्याच्या पंचमीला पांडव पंचमी साजरी केली जाते. व्यासांनी लिहिलेल्या महाभारतानुसार याच दिवशी कुरुक्षेत्रात पांडवांनी कौरवांना हरवून हस्तिनापुरी वर विजय मिळवला होता. 

यंदाची पांडव पंचमी 29 ऑक्टोबर रोजी म्हणजे आज साजरी होत आहे. दिवाळी झाल्यावर, म्हणजेच कार्तिक महिन्यातील पाचव्या दिवशी आपण पांडव पंचमी साजरी करतो.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की पांडव पंचमी का साजरी केली जाते? तर पांडवांनी कौरवांवर विजय मिळवला तो दिवस आपण पांडव पंचमी म्हणून साजरा करतो. लग्न झालेल्या आणि संतती प्राप्तीसाठी स्त्रिया घरासमोर शेणाच्या गोळ्यांचे पाच पांडव मांडतात. प्रत्येक पांडवाची पूजा करून त्यांच्यासारखं गुणी बाळ व्हावं म्हणून आराधना करतात. पांडव पंचमीची सविस्तर माहिती म्हणजे पुजेचा विधी महत्व आणि आख्यायिका आपण या लेखात जाणून घेऊया.

व्यासकृत महाभारतानुसार, हस्तिनावतीच्या सिंहासनावरून कौरव व पांडवांमध्ये युद्ध झाले, हे सर्वज्ञात आहेच. त्यावेळी श्रीकृष्णाच्या मार्गदर्शनाखाली पांडवांनी कौरवांशी लढाई केली. राहायला छप्पर नाही, वडिलांचे छत्र नाही, पुरेसे मनुष्यबळ नाही. युद्धासाठी लागणारी दौलत नाही अशा परिस्थितीत सुद्धा कठोर परिश्रम करून हस्तिनावतीत आपले स्थान निर्माण केले.आपल्या गुणांच्या बळावर खांडवप्रस्थाचे राज्य उभे केले. तसेच वनवासात व अज्ञातवासात जाऊन आल्यानंतर हस्तिनावतीसारख्या प्रतिष्ठित सिंहासनाला आव्हान करून सिंहासन जिंकून घेतले. भावांच्या विरुद्ध विचार आणि मतांचा आदर करत आपल्यातील एकजूट कायम ठेवली. आईचा प्रत्येक आदेश शिरोधार्य मानला. आपल्यावरील अन्यायाचे निराकरण केले. अशी गुणी व विजयी मुले आपल्यालाही व्हावीत म्हणून प्रत्येक आई पांडवपंचमीच्या दिवशी पांडवांची पूजा करून गुणी, आज्ञाधारक व बलवान मुलांनी आपली कूस उजळावी अशी प्रार्थना करते.

पांडव पंचमीची आख्यायिका काय आहे?

महाभारतातील दोन महत्त्वाचे घटक म्हणजे पांडव आणि कौरव. पांडव पंचमी म्हणजे पांडवांचा विजय दिवस. श्रीकृष्णाच्या मार्गदर्शनाखाली युद्ध करून अल्प संख्याबळ असूनही बलाढ्य अशा कौरवसेनेचा नायनाट करणार्‍या पांडवांनी जगासमोर मोठा आदर्श उभा केला. पांडवांसारखे गुण आपल्यात यावेत, यासाठी हा दिवस साजरा करतात, अशी मान्यता आहे. द्यूतात कौरवांकडून हरलेल्या पांडवांना कबूल केल्याप्रमाणे 12 वर्षे वनवास व 1 वर्ष अज्ञातवासात काढावे लागले. कार्तिक शुक्ल पंचमीला पांडव अज्ञातवासातून प्रकट झाले. आपण ऋषीपंचमी साजरी करतो, त्याप्रमाणे भारतीय संस्कृतीत पांडव पंचमीदेखील साजरी केली जाते. 

Pandav Panchami
Diwali Bhaubeej 2022 : ...म्हणून साजरी केली जाते भाऊबीज; जाणून घ्या पुराणातील महत्त्व

पांडव पंचमी म्हणजे पांडवांच्या विजयामुळे त्यांची पूजा करून त्यांच्यात असलेले शौर्य, विरता आणि आदर्श गुणांचे पूजन करण्याची परंपरा प्रचलित असल्याचे दिसून येतेसंपूर्ण देशभरात पांडवांसारखे पुत्र घराघरात जन्माला यावेत आणि पांडवांचे गुण, शौर्य, विरता आणि हार न मानण्याची शक्ती आपल्या अपत्यात यावी, यासाठी पांडवांची पूजा मोठ्या भक्तीभावाने करण्याची परंपरा प्रचलित आहे. यावेळी श्रीकृष्णाचे पूजनही आवर्जुन केले जाते. या दिवशी श्रीकृष्णाचा नामजप अधिकाधिक करावा, असे सांगितले जाते.

Pandav Panchami
Bhulabai: भुलाबाईच्या पारंपरिक गाण्यांचा इतिहास

पांडव पंचमीला गोमयापासून पांडव सिद्ध करतात आणि त्यांची पूजा करतात. छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्याचे पुजारी कांकेर गावात आजच्या काळातही पांडवांची पूजा करतात. येथे दर दोन वर्षांनी एका मोठ्या यात्रेचे आयोजित केल्या जाते. कौरावांकडून सर्व काही गमावल्यानंतर पांडव दंडकारण्य भागात काही काळासाठी वास्तव्यास होते. पांडव अज्ञातवासात गेले असता त्यांनी या भागात आश्रय घेतला होता. म्हणून या डोंगराचे नाव पांडव पर्वत नाव पडले. या पर्वतावरून पांडव भोपाळत्तनम जवळील सक्काळनारायण गुहेत श्रीकृष्णाची मूर्ती असल्याचे पाहायला मिळते.

Pandav Panchami
हिवाळ्यात आवळा खाण्याचे फायदे

हिंंदु संस्कृती पांडवांची पूजा कशी मांडतात? 

पहाटे सूर्योदयानंतर दारात रांगोळी समोर पाट किंवा चौरंग मांडून त्यावर पाच पाने मांडली जातात. त्यावर सकाळच्या ताज्या शेणाचे पाच गोळे मांडले जातात. त्यांच्यावर निवडुंगाच्या झाडाचे दिवे रोवून एक दिवा विहिरीजवळ किंवा जवळच्या जलस्थानाजवळ ठेवला जातो. 

Pandav Panchami
Diwali Faral history : हडप्पा संस्कृतीच्या काळातही लाडू बनवले जायचे

पांडव पंचमीचीला जैनांची ज्ञानपंचमी देखील म्हणतात .

कार्तिक शुद्ध पंचमी हा दिवस जैन संस्कृतीत ज्ञानपंचमी म्हणून साजरा केला जातो. हा दिवस जैन बांधव मोठ्या उत्साहात साजरा करतात. जैन प्रार्थना स्थळांमध्ये या दिवशी विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. कार्तिक शुद्ध पंचमी हा ज्ञानपूजेचा दिवस मानला जातो. या दिवशी ध्यान व प्रार्थना केल्यास 'दुसरा सूर्य' म्हणजेच 'ज्ञान' प्राप्त होते, अशी मान्यता असल्याचे म्हटले जाते. ज्ञानपंचमी एक सण म्हणून जैन बांधव साजरा करतात, असे सांगितले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.