Paryushan Parv 2024: जैन धर्माचे शाश्वत पर्व पर्युषण

Paryushan Parv 2024: जैन धर्माचे एक शाश्वत पवित्र पर्व म्हणजेच पर्युषण महापर्व आहे. हे पर्व धर्म आराधना करण्याचे पर्व आहे.
Paryushan Parv 2024
Paryushan Parv 2024 sakal
Updated on

Paryushan Parv 2024: जैन धर्माचे एक शाश्वत पवित्र पर्व म्हणजेच पर्युषण महापर्व आहे. हे पर्व धर्म आराधना करण्याचे पर्व आहे. जैन ग्रंथामध्ये पर्युषण ची परिभाषा सांगितली आहे. ती म्हणजे "परि आसमंतात उष्यंते दहयंते पाप कर्मणी इस्मिन् तत पर्युषणम" म्हणजेच जो पाप कर्माचे ज्वलन/शमन करून जो आत्मधर्म करून आत्मगुणांना प्रकट करतो ते पर्व म्हणजे पर्युषण पर्व.

पर्युषण या शब्दाचा अपभ्रंश झाला आहे. पज्जुसन, पज्जोसावन, पज्जोस्मान इत्यादि त्याचे रूप आहेत. त्याचे संस्कृत रूप पर्युषण, पर्युपाशमन, पर्युपवास आणि पर्युपासन इ. पर्युषण (परी + उषान) म्हणजे भावनांपासून मुक्त होणे आणि निसर्गाचा आनंद घेणे. पर्युपाशमन (परी + उपशमन) चा अर्थ कषय (क्रोध इ.) च्या भावनांना वश करणे असा आहे. पर्युपवास (परी+उपवास) म्हणजे एका ठिकाणी तिष्ठासह आपल्या आत्म्यात वास करणे किंवा लीन होणे. परीपासन (परी+उपासना) म्हणजे उत्कृष्ट उपासना म्हणजे आत्म-पूजा. अशा प्रकारे प्रत्येक दृष्टीकोनातून पर्युषण हा आत्मनिरीक्षण, आत्मपरिकक्षण, आत्मजागरण, आत्मशुद्धी  आणि आत्मप्राप्तीचे महान पर्व आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.