Pausha Putrada Ekadashi 2023: यंदा कधी आहे पौष पुत्रदा एकादशी?

दर महिन्याला दोन एकादशी असतात – एक कृष्ण पक्षाची आणि एक शुक्ल पक्षाची.
Pausha Putrada Ekadashi 2023
Pausha Putrada Ekadashi 2023Esakal
Updated on

पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला पौष पुत्रदा एकादशी म्हणतात. या एकादशीचे व्रत पाळल्याने आणि परंपरेनुसार विष्णूची पूजा केल्यानं पुत्रप्राप्ती होते, अशी श्रद्धा आहे.

यंदा कधी आहे पौष पुत्रदा एकादशी?

2 जानेवारीला पौष पुत्रदा एकादशीला रवि, शुभ आणि साध्य नावाचे तीन योग तयार होत आहेत. सर्वप्रथम रवि योगाबद्दल बोलूया. हा योग सकाळी 07:14 पासून सुरू होईल आणि दुपारी 02:24 पर्यंत राहील. रवि योगात सूर्याचा प्रभाव अधिक असतो. हा योग अशुभ प्रभाव दूर करतो. या योगात तुम्ही कोणतेही शुभ कार्य करू शकता.

हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार एकादशीचे व्रत सर्वात महत्त्वाचे मानले जाते. दर महिन्याला दोन एकादशी असतात – एक कृष्ण पक्षाची आणि एक शुक्ल पक्षाची. अशा प्रकारे वर्षभरात एकूण 24 एकादशी येतात. जे लोक एकादशीचे व्रत नियमित करतात, त्यांचे मनोबल मजबूत होते आणि त्यांचे आरोग्य चांगले राहते, अशी लोकांची श्रद्धा आहे. एकादशीचे व्रत केल्याने  आर्थिक समस्येतून मुक्ती मिळते. मानसिक संतुलन चांगले राहते. त्यामुळे एकादशीचे व्रत अत्यंत पवित्र मानले जाते.पौष पुत्रदा एकादशीला संतान प्राप्त करायचे असेल, संतानसुख मिळवायचे असेल किंवा मुलांशी संबंधित कोणतीही समस्या तुम्हाला भेडसावत असेल, तर हे व्रत खूप महत्त्वाचे आहे.

Pausha Putrada Ekadashi 2023
Winter Recipe: आरोग्यवर्धक लवंगी चहा कसा तयार करायचा?

पौष पुत्रदा एकादशीचे व्रत कसे करतात ?

एकादशीला विष्णूची पूजा केली जाते. या दिवशी तुम्हाला लवकर उठून भगवान विष्णूची पूजा करायची आहे, पण त्याआधी तुम्हाला काही खास गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. सर्वप्रथम उपवास करावा. या दिवशी पती-पत्नी दोघांनीही सकाळी उठून भगवान विष्णूची पूजा करावी आणि त्याचवेळी भगवान विष्णूला पिवळी फळे आणि फुले अर्पण करावीत. तुळशीची पाने पंचरमीत भगवान विष्णूला अर्पण करावीत. त्यानंतर या सर्व गोष्टी प्रसाद म्हणून घ्याव्या लागतात.

Pausha Putrada Ekadashi 2023
Winter Recipe: हिवाळ्यात शरीराला पौष्टिक असणारी अळीवाची खिर कशी तयार करावी?

ज्या दाम्पत्याला दीर्घकाळापासून संततीची इच्छा आहे त्यांच्यासाठी हे व्रत अत्यंत फलदायी मानले जाते. या दिवशी संतानप्राप्तीसाठी उपवास केला जातो व उपवास करणाऱ्या व्यक्तीने सकाळी स्नान करून हातात पाणी घेऊन व्रताचे व्रत करावे. लक्षात ठेवा की या दिवशी आंघोळीच्या पाण्यात गंगाजल अवश्य मिसळावे. यानंतर एका पाटावर लाल कपडा पसरवून भगवान विष्णूची मूर्ती स्थापित करा.यानंतर मूर्तीसमोर कलशाची स्थापना करून त्या कलशाची लाल कपड्याने बांधून पूजा करावी. भगवान विष्णूंना शुद्ध करून नवीन वस्त्रे परिधान करून तुपाचा दिवा लावावा. भगवान विष्णूची पूजा केल्यानंतर पुत्रदा एकादशीची कथा वाचून आरती करावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.