Vastu Rules About Hanging Photos At Home Wall :
आपण घर, रूम सजवताना मोठ्या कौतुकाने घराच्या भिंतींवर मुलांचे फोटो लावतो. त्यांच्या लहानपणा पासूनच्या आठवणी या फोटोंमधून बघून आपल्याला आनंद होतो. पण तुम्हाला हे माहित आहे का की, कौतुकाने काढलेल्या या फोटोंना लावताना काही चुक झाली तर ती तुम्हाला फार जड जाऊ शकते.
वास्तूशास्त्रात मुलांचे फोटो लावण्यासंदर्भात काही खास नियम सांगण्यात आले आहेत. हे नियम लक्षात घेऊन जर तुम्ही घरात मुलांचे फोटो लावले तर घरातलं वातावरण चांगले राहू शकेल. जाणून घेऊया.
घराच्या पश्चिम दिशेचा संबंध मुल आणि क्रिएटिव्हिटी यांच्याशी असतो. या दिशेला मुलांचे फोटो लावणे शुभ मानले जाते. या दिशेला मुलांचे फोटो लावल्याने ते अभ्यासात हुशार आणि आयुष्यात कायम पुढे जातात.
जर तुम्हाला एकुलता एक मुलगा असेल तर त्याचा फोटो दक्षिणेला लावू शकाल. असं केल्याने मुल लवकर जबाबदार होऊन कुटुंबाची जबाबदारी घेऊ शकेल. या दिशेचा संबंध घराच्या मालकाशी असते. त्यामुळे या दिशेला एकुलत्या एक मुलाचा फोटो लावू शकतात.
पूर्व दिशेला मुलाचा फोटो लावल्याने तो हुशार आणि ओजस्वी होतो. आयुष्यात एक चांगली उंची गाठू शकतो. परमेश्वराची त्याच्यावर चांगली कृपा राहते.
घरातल्या उत्तर पूर्व दिशेला जर तुम्हाला मुलांचे फोटो लावायचे असतील तर ज्यात तुम्हीही आपल्या मुलांसोबत असाल तेच फोटो लावावे. त्यामुळे या दिशेला फॅमिली फोटो लावणे सगळ्यात शुभ मानले जाते. या दिशेला फॅमिली फोटो लावण्याने नातं मजबुत होतं असं मानलं जातं. मुलांमध्ये कौटुंबिक नातं घट्ट होतं आणि गोडवा वाढतो.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.