Vastu Tips : कबुतराच्या पिसांमुळे तुमच्या घरी पडू शकतो पैशांचा पाऊस, शास्त्रात सांगितलेत हे उपाय

वास्तूशास्त्रात कबुतराच्या पिसांमुळे धनलाभ होण्याचे उपाय सांगितले आहेत, जाणून घ्या.
Vastu Tips
Vastu Tipsesakal
Updated on

Pigeon Feather Vastu Tips : कबुतरं फार घाण करतात म्हणून हल्ली फार कटकट करणाऱ्या लोकांसाठी हे जाणून घेणं फार आवश्यक आहे की, वास्तूशास्त्रात या पक्षाच्या पिसाने धनलाभ होऊ शकतो असं सांगितलं आहे.

वास्तूशास्त्रानुसार घरात जर कबुतराचे आगमन झाले तर ते फार शुभ मानले जाते. आणि त्याच्या पिसांचे काही उपाय केल्याने घरात धनवर्षा होऊ शकते.

तज्ज्ञ सांगतात की, कबुतराला फार शुभ मानलं गेलं आहे. त्याच्या पिसांच्या या उपायाने घरात पैशाची कधी कमी जाणवत नाही. पूर्वीच्या काळी कबुतर जसे पत्र पोहचवण्याचं काम करत तसे त्यांना इश्वराचेही संदेश वाहक मानले जाते. म्हणूनच ज्योतिषशास्त्रात असं मानलं जातं की, जर कबुतर तुमच्या घरात येत असेल तर त्यामुळे काहीतरी शुभ संदेश मिळणार आहे.

कबुतराचं घरात येणं हे शुभसंकेत असून ते समृद्धीचे संकेत समजले जातात. पण जर कबुतर तुमच्या घरात अंडी देत असेल तर समजा की, नक्कीच काहीतरी शुभ वार्ता मिळणार आहे.

असं म्हणतात की, कबुतराचं पिस हे धनाचे संकेत असतात. त्यामुळे जर कबुतर तुमच्या घरात पिस सोडत असेल तर ती तुमच्यासाठी भेट आहे असं समजा.

उपाय काय करावा?

  • यासाठी कबुतराच्या पंखाचं पिस घ्यावं.

  • त्याला लाल किंवा पांढऱ्या कापडात गुंडाळावं.

  • देवी लक्ष्मीचं स्मरण करत त्यावर लाल धाग्याने ७ वेळा गुंडाळावं.

  • हे घरात अशा ठिकाणी ठेवा जिथे तुम्ही धन ठेवतात.

  • कबुतराचे तीन पिसं घेऊन ते घराच्या वेगवेगळ्या कोपऱ्यांमध्ये ठेवा.

  • एक पिस लिव्हिंग रुमच्या दक्षिण कोपऱ्यात ठेवा.

  • एक पिस किचनच्या उत्तर कोपऱ्यात ठेवा.

  • गुरुवारी जर एका पिवळ्या कापडात हळकुंड, पिस आणि पिवळी कवडी एकत्र बांधून घराच्या तिजोरीत ठेवा. यामुळे नोकरीचे प्रश्न सुटतील.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.