Pitru Paksha Thali : या पदार्थांसह असे वाढा पितरांचे ताट

यावर्षी पितृ पक्ष १० सप्टेंबरपासून सुरू होणार असून २५ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे.
Pitru Paksha Thali
Pitru Paksha Thaliesakal
Updated on

Pitru Paksha : पितृ पक्ष भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि अश्विन महिन्याच्या अमावास्येपर्यंत असतो. पितृपक्षातील पितरांच्या शांतीसाठी दानधर्म करण्याचे विशेष महत्त्व दिले गेले आहे. या १५ दिवसांच्या कालावधीत लोक पितरांचे आशीर्वाद मिळविण्यासाठी श्राद्ध विधी करतात. यावर्षी पितृ पक्ष १० सप्टेंबरपासून सुरू होणार असून २५ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे.

Pitru Paksha Thali
Pitru Paksha 2022: पितृ पक्षाचा संपूर्ण पंधरवाडा कोणते शुभ काम करू नका: फक्त मनोभावे पितृ पक्ष साजरा करा

पितृपक्षाचे महत्त्व

पितृपक्षात पिंडदान, तर्पण केले जाते. काही ठिकाणी ब्राह्मणांना भोजनही केले जाते. यामुळे पितर प्रसन्न होऊन कुटुंबाला आशीर्वाद देतात. पितृ पक्षामध्ये तर्पण, श्राद्ध आणि पिंडदान हे १६ दिवसांच्या कालावधीमध्ये केले जातात. पितृपक्षात जे पितरांना तर्पण आणि पिंड दान अर्पण करत नाहीत. त्यांना पितृदोषाचा सामना करावा लागतो. त्यांच्या घरात काही सतत कलह आणि अनुचित घटना घडतात.

Pitru Paksha Thali
Pitru Paksha 2022: पितृपक्षात 'या' गोष्टी चुकूनही करू नका, नाही तर लागु शकतो पितृदोष

पितृपक्षाच्या थाळीमध्ये काय असावे?

आपल्या पूर्वजांना विशेष अन्न अर्पण करून कृतज्ञता व्यक्त करतो. पितृपक्षाच्या थाळीमध्ये

चणा डाळ वडे, उडीद डाळ वडे, आलू वडी आणि कांदा भाजी, पाटवडी, तांदळाची खीर, कढी दही-भात, कुरडई, पापड असते. त्याचबरोबर भाज्यांमध्ये मेथीची भाजी, बटाटा भजी, लाल भोपळा भाजी, गवार भाजी, भेंडी भाजी आणि कारल्याची भाजी यांचा समावेश होतो. पितृपक्षाच्या थाळीमध्ये कढी आणि तांदळाची खीर यांचे विशेष महत्व असते.

मात्र पितृपक्षाच्या जेवणातील हे पदार्थ प्रांतानुसार आणि पद्धतींनुसार बदलतात. काही ठिकाणी कांदा लसूण विरहित स्वयंपाकही केला जातो.

Pitru Paksha Thali
Pitra Dosh: पितृदोष म्हणजे काय? का लागतो पितृदोष जाणून घ्या कारणे आणि उपाय

पितरांचे ताट वाढताना घ्या ही काळजी

  1. पितरांसाठी ताट वाढताना सर्व पदार्थ उलट क्रमाने वाढावे.

  2. ताटात मीठ, लिंबू सर्वात शेवटी वाढावे.

  3. सर्व भाज्या एका बाजूला आणि चटण्या दुसऱ्या बाजूला व्हाव्या.

  4. ताटाच्या मधोमध भात-वरण ठेवावे. तसेच मध्यभागीच कढी आणि खीर ठेवावी.

  5. कोशिंबीर किंवा भातावर वरण वाढताना त्याचा ओघळ इतर पदार्थांवर येऊ नये अशा पद्धतीने ताट वाढावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.