PM Modi Oath Ceremony 2024: आज नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. गेल्या शुक्रवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नरेंद्र मोदींना सरकार स्थापनेचे निमंत्रण दिले होते.
देशात झालेल्या १८ व्या लोकसभा निवडणुकीचे निकाल ४ जून रोजी जाहीर झाले आहेत. यामध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीने २९२जागा जिंकल्या आणि बहुमताचा आकडा पार केला तर भाजपला २४० जागा मिळाल्या आहेत.
नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. या सोहळ्यासाठी रविवार, ९ जून २०२४ ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. राष्ट्रपती भवनात रविवारी संध्याकाळी ७.१५ वाजता शपथविधी सोहळा पार पडणार आहे. यापूर्वी मोदी ८ जूनला पंतप्रधानपदाची शपथ घेणार असल्याची चर्चा होती. मात्र नंतर ९ जून ही तारीख निश्चित करण्यात आली. पण तारीख बदलण्याबाबत नेमकी माहिती समोर आलेली नाही. परंतु ९ जून ही तारीख निश्चित करण्याचे एक कारण या दिवशी तयार होणारे शुभ आणि शक्तिशाली योग असू शकतात. मोदी ज्या दिवशी पंतप्रधान म्हणून शपथ घेतील त्या दिवशी कोणते शुभ संयोग तयार होतील ते जाणून घेऊया.
हिंदू कॅलेंडरनुसार ९ जूनला रविवार आला आहे आणि ज्येष्ठ शुक्ल पक्षाची तृतीया तिथी आहे. या दिवशी वृद्धी आणि ध्रुव योग असणार असून रात्री ८.२० पर्यंत पुनर्वसु नक्षत्र आणि त्यानंतर पुष्य नक्षत्र राहील. चंद्र कर्क राशीत प्रवेश करेल. राहुकाल संध्याकाळी ०५:२७ ते ०७:०७ पर्यंत राहील. अशावेळी राहुकाल संपल्यानंतर आणि पुनर्वसु नक्षत्रात नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत.
नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ यापूर्वी ८ जूनला घेणार होते. पण नंतर ही तारीख बदलून ९ जून करण्यात आली. ज्योतिषशास्त्रानुसार ९ जून हा रविवार असून तो सूर्याचा दिवस आहे. ज्योतिषशास्त्रात सूर्याला ग्रहांचा राजा आणि सत्ताधारी शक्तीचा कारक म्हटले जाते. सूर्य हा सरकारवर राज्य करणारा आहे.
अशाप्रकारे पंतप्रधानपदाच्या शपथविधीच्या दिवशी सूर्याचा प्रभाव असणार आहे. अशावेळी या ग्रहाच्या प्रभावाखाली स्थापन झालेले नवे सरकार देश आणि जगासाठी फायदेशीर ठरेल अशी अपेक्षा आहे.
९ जून रोजी रात्री ८.२० पर्यंत पुनर्वसु नक्षत्र असेल आणि या नक्षत्रात मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेणार. धार्मिक दृष्टीकोनातून हे नक्षत्र अतिशय शुभ मानले जाते. कारण भगवान रामाचा जन्म याच नक्षत्रात झाला होता. पंतप्रधान मोदी हेही प्रभू रामाचे भक्त आहेत.
हिंदू धर्मात प्रत्येक काम हे शुभ मुहुर्त पाहूनच केले जातात. त्यामुळे कार्य यशस्वीपणे पूर्ण होतात. ज्योतिषशास्त्रानुसार, कॅलेंडरमधील 4 था, 9वा, अमावस्या, चतुर्दशी आणि पौर्णिमा हे दिवस शपथ घेण्यासाठी शुभ मानले जात नाहीत. रोहिणी, पुष्य, अनुराधा, ज्येष्ठा, मृगाशिरा, श्रावण, उत्तराषाढ, रेवती, उत्तराभाद्रपद आणि अश्विनी नक्षत्र हे शपथविधी शुभ मानले जातात.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.