Putrada Ekadashi 2024: श्रावण महिना ५ ऑगस्टपासून सुरू झाला आहे. या महिन्याच्या शुल्क पक्षातील एकादशीला पुत्रदा एकादशी म्हणतात. हिंदू धर्मात पुत्रदा एकादशीला खुप महत्व आहे. वर्षभरात २४ एकादशी येतात. एकादशीचा पवित्र दिवस भगवान विष्णूला समर्पित असतो. या दिवशी मनोभावे भगवान विष्णूंची पुजा केली जाते. यंदा श्रावणातील पुत्रदा एकादशी १६ ऑगस्टला साजरी केली जात आहे. श्रावणात पुत्रदा एकादशीचे व्रत पुत्रप्राप्तीसाठी आणि संततीच्या रक्षणासाठी केले जाते अशी मान्यता आहे. या दिवशी कोणते उपाय करावे हे जाणून घेऊया.