Rakhi According To Zodiac Signs: बहिण-भावाच्या नात्यातील गोडवा वाढवणारा रक्षाबंधन यंदा १९ ऑगस्टला साजरा केला जाणार आहे. हा दिवस प्रत्येक बहिणीसाठी खुप खास असतो. या दिवशी बहिण आपल्या भावाला ओवाळते आणि मनगटावर राखी बांधते.
रक्षाबंधननिमित्त सर्व बाजारापेठा रंगीत आणि आकर्षक राख्यांनी सजली आहे. पण आपल्या लाडक्या भावासाठी राखी खरेदी करताना भावाच्या राशीनुसार खरेदी करावी. शास्त्रानुसार भावाच्या राशीनुसार मनगटावर राखी बांधल्यास त्याच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतील. चला तर मग जाणून घ्या तुमच्या भावाची रास कोणती आणि त्याला कोणती राखी बांधावी.