Ram Navami 2024 : टीम लीडर व्हायचंय? रामायणातील या पाच गोष्टी कायम लक्षात ठेवा

रामायणात अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत ज्या आजच्या काळातही एखाद्या लीडरसाठी मार्गदर्शकच आहेत.
Ram Navami 2024
Ram Navami 2024 esakal
Updated on

Leadership Quality Tips From Ramayana : मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांच्या आदर्श जीवनाची कहाणी म्हणजे रामायण आहे. प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव म्हणून साजरी होणारी राम नवमी यंदा ३० मार्च रोजी आहे. या दिवशी श्रीरामांची पूजा, रामायणाचा पाठ या गोष्टींना विशेष महत्व देण्यात आले आहे.

हल्ली पुराणानतली वानगी पुराणात या पद्धतीने पौराणिक कथांकडे बघितलं जात असलं तरी; रामायणातल्या या ओव्या उत्तम लीडर कसा असावा किंवा काय करावे आणि काय नाही याचे उत्तम उदाहरण आहे. जे आजच्या काळातही नक्कीच उपयुक्त आहे. (Ram Navami 2024)

अगदी टीम लीडपासून ते राजकारण्यांपर्यंत सर्वांसाठीच या ओव्या उपयुक्त आहेत. लीडरने कसे नसावे आणि नको ते वागल्याने काय परिणाम होऊ शकतात याचे थोडक्यात पण थेट मार्गदर्शन या ओव्या करतात. 
लीडरने हट्टी, रिजीड नसावे. वागणुकीत नव्या गोष्टी शिकण्यात लवचिकता असावी. कोणत्याही गोष्टीचा अति अभिमान बाळगू नये. सतत रागात, आरडा ओरडा करणारा लीडर नसावा असा जर लीडर असेल, मग तो कितीही मोठ्या पदावर असला तरी संकट काळात लोक त्याचाच नाश करतात.
अगदी टीम लीडपासून ते राजकारण्यांपर्यंत सर्वांसाठीच या ओव्या उपयुक्त आहेत. लीडरने कसे नसावे आणि नको ते वागल्याने काय परिणाम होऊ शकतात याचे थोडक्यात पण थेट मार्गदर्शन या ओव्या करतात. लीडरने हट्टी, रिजीड नसावे. वागणुकीत नव्या गोष्टी शिकण्यात लवचिकता असावी. कोणत्याही गोष्टीचा अति अभिमान बाळगू नये. सतत रागात, आरडा ओरडा करणारा लीडर नसावा असा जर लीडर असेल, मग तो कितीही मोठ्या पदावर असला तरी संकट काळात लोक त्याचाच नाश करतात. esakal
कोणत्याही लीडरला आपल्या टीम विषयी संपूर्ण माहिती असणे आवश्यक असते. त्यासाठी त्याने हेर पेरून ठेवणं त्याच्या हिताचं ठरतं. टीम मधल्या प्रत्येकाशी त्याचा संपर्क, संवाद असायला हवा. दुसऱ्याच्या आधीन किंवा स्त्री लंपट नसावा. नाहीतर संधी पाहताच त्याची टीम त्याला सोडून जाते.
कोणत्याही लीडरला आपल्या टीम विषयी संपूर्ण माहिती असणे आवश्यक असते. त्यासाठी त्याने हेर पेरून ठेवणं त्याच्या हिताचं ठरतं. टीम मधल्या प्रत्येकाशी त्याचा संपर्क, संवाद असायला हवा. दुसऱ्याच्या आधीन किंवा स्त्री लंपट नसावा. नाहीतर संधी पाहताच त्याची टीम त्याला सोडून जाते. esakal
कोणत्याही लीडरसाठी क्रोध हा त्याचा सर्वात मोठा शत्रू आहे असं समजावं. जो लीडर सतत चीडचीड करतो, रागवत असतो त्याची टीम नकळत त्याच्यापासून दुरावत जाते. मित्र कमी आणि शत्रू वाढू लागतात. क्रोध त्याचा सर्वनाश करणारा घटक ठरू शकतो. 
त्यामुळे जी कामं तुम्ही रागवूनही होणार नाहीत ती प्रेमाने अगदी सहज होऊ शकतात. त्यामुळे गोड बोलून कामं काढून घेणं जमायला हवं.
कोणत्याही लीडरसाठी क्रोध हा त्याचा सर्वात मोठा शत्रू आहे असं समजावं. जो लीडर सतत चीडचीड करतो, रागवत असतो त्याची टीम नकळत त्याच्यापासून दुरावत जाते. मित्र कमी आणि शत्रू वाढू लागतात. क्रोध त्याचा सर्वनाश करणारा घटक ठरू शकतो. त्यामुळे जी कामं तुम्ही रागवूनही होणार नाहीत ती प्रेमाने अगदी सहज होऊ शकतात. त्यामुळे गोड बोलून कामं काढून घेणं जमायला हवं. esakal
श्रीरामांचं आयुष्य हे अनेक संकटांनी भरलेलं होतं. अनेक दुःख, आव्हानं वेळोवेळी त्यांच्या समोर आलीत. पण त्यात कधीही खचून न जाता त्यांनी प्रत्येक वेळी धीराने प्रसंगांना तोंड दिलं आहे. 
असंच लीडरने असायला हवं. अपयश, अडचणी, संकटं, आव्हानं यांनी खचून न जाता टीमला सांभाळत ठाम राहत काम तडीस न्यायला हवं. अडचणींचा बाऊ करत बसू नये. त्याने खचून जाऊन माघार घेऊ नये.
श्रीरामांचं आयुष्य हे अनेक संकटांनी भरलेलं होतं. अनेक दुःख, आव्हानं वेळोवेळी त्यांच्या समोर आलीत. पण त्यात कधीही खचून न जाता त्यांनी प्रत्येक वेळी धीराने प्रसंगांना तोंड दिलं आहे. असंच लीडरने असायला हवं. अपयश, अडचणी, संकटं, आव्हानं यांनी खचून न जाता टीमला सांभाळत ठाम राहत काम तडीस न्यायला हवं. अडचणींचा बाऊ करत बसू नये. त्याने खचून जाऊन माघार घेऊ नये. esakal
लीडरची प्रत्येक कृती ही टीमच्या हिताच्या दृष्टीने असायला हवी. स्वार्थासाठी नसावी. आणि असं हीत साधताना जर त्याला साम, दाम, दंड, भेद याचा थोडाफार वापर करावा लागला तर तो त्याने करावा. मोठ्या समुहाचं हित साधताना लहान पातकं माफ असतात.
लीडरची प्रत्येक कृती ही टीमच्या हिताच्या दृष्टीने असायला हवी. स्वार्थासाठी नसावी. आणि असं हीत साधताना जर त्याला साम, दाम, दंड, भेद याचा थोडाफार वापर करावा लागला तर तो त्याने करावा. मोठ्या समुहाचं हित साधताना लहान पातकं माफ असतात. esakal

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()