Ayodhya Ram Mandir : रामलल्लांच्या मूर्तीची कित्येक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आज (२२ जानेवारी २०२४) अयोध्येतल्या मंदिरात प्राणप्रतिष्ठा होत आहे. देशातीलच नव्हे, तर जगभरातील प्रभू श्रीरामभक्तांना या मंदिराबाबत उत्सुकता आहे. हे मंदिर नेमके कसे आहे, त्याची वैशिष्ट्ये काय आहेत, सुविधा कोणत्या असतील आदी गोष्टींवर एक नजर....
मंदिरासाठी १८ एकर जागेत बांधकाम होईल, त्यातील ३५ टक्के जागेत बांधकाम असेल. उर्वरित जागेत रस्ते असतील. १० टक्के जागेत भाविकांसाठी विविध सुविधा असतील. मंदिराच्या ६७ एकर जागेत ५ लहान टेकड्या आहेत( अंगद टिला, कुबेर टिला,नल टिला, शेषनाग टिला, पिंडारक) . पाचव्या टेकडीवर मंदिर असेल. (पिंडारक)
२३५ फूट मंदिराची रुंदी
३६० फूट मंदिराची लांबी
२.७ एकरवर मुख्य मंदिराचे बांधकाम
६७.७ एकर मंदिर उभारणी
५७ हजार ४०० चौरस फूट एकूण बांधकाम
१२ मंदिरासाठी प्रवेशद्वारे
१८ एकर मंदिर परकोटा (प्रदक्षिणा मार्ग)
५ एकूण डोम
३ एकूण मजले
२० फूट प्रत्येक मजल्याची उंची
तळमजला : राममूर्ती
पहिला मजला : श्रीराम पंचायतन
दुसरा मजला : विविध देवतांच्या मूर्ती
तळमजल्यावरील खांब (कॉलम) - १६०
पहिल्या मजल्या-वरील खांब १३२
दुसऱ्या मजल्या-वरील खांब - ७४
भाविक - पर्यटक केंद्र
बहुमजली वाहनतळ
प्रशासकीय कार्यालय
भाविकांसाठी लॉकर रूम
कर्मचारी निवास
भाविकांसाठी सरकते जिने (एक्स्लेटर)
मंदिराच्या चारही दिशांना १५ मिनिटांच्या अंतरावर स्वच्छतागृहे
बॅंका, एटीएम आदी सुविधा
रामकुंड - यज्ञशाळा
कर्मक्षेत्र - धार्मिक कार्यक्रमांसाठी जागा
हनुमान गढी - वीर मारुतीची भव्य मूर्ती
श्रीरामलल्ला दर्शन मंडल - जन्मभूमी संग्रहालय
गुरू वशिष्ठ पीठिका - वेद, पुराण, रामायण, संस्कृत अभ्यास आणि संशोधन केंद्र
श्रीरामकीर्ती - सत्संग भवन सभागार
भक्तिटिला - विशेष शांती क्षेत्र, ध्यानकेंद्र
तुलसी - रामलीला केंद्र, ३६० डिग्री थिएटर, मुक्ताकाशी मंच
लव-कुश निकुंज - युवक, मुलांसाठी सांस्कृतिक केंद्र
राम दरबार - प्रोजेक्शन थिएटर
भरत प्रसाद - प्रसादवाटप केंद्र
माता सीता रसोई अन्नक्षेत्र - भांडार, अन्नछत्रालय,
महर्षी वाल्मीकी संशोधन केंद्र
श्रीदशरथ - आदर्श गोशाळा
बलिदानाचे मेमोरिअल
याशिवाय भाविकांसाठी अनेक सुविधा
मार्च २०२१ : राम मंदिरासाठी जमिनीचे सपाटीकरण
एप्रिल २०२१ ते ऑक्टोबर २०२१ : मंदिराची पायाभरणी
ऑक्टोबर २०२१ ते मार्च २०२२ : स्लॅब उभारणीचे (प्लिंथ) काम
मार्च २०२२ ते ऑक्टोबर २०२३ : पहिला, दुसरा आणि तिसऱ्या मजल्याचे काम
ऑक्टोबर २०२३ ते जाने. २०२४ : कळसाचे काम
२२ जाने. - २०२४ : राम मंदिराचा उद्घाटन सोहळा
एप्रिल २०२५ पर्यंत : संरक्षक भिंत, परिक्रमा जागेचे सुशोभीकरण आदी.
आयआयटी : पायाभरणी व्यवस्थापन (फाउंडेशन मॅनेजमेंट)
एल अँड टी : प्रत्यक्ष अंमलबजावणी, देखरेख
टाटा : प्रकल्प व्यवस्थापन (प्रोजेक्ट मॅनेजमेंट)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.