Ratha Saptami 2022: जन्मकुंडलीतील सूर्याची प्रतिकूलता कशी दूर कराल? जाणून घ्या उपाय

माघ महिन्यातील शुक्ल सप्तमीला रथ सप्तमी साजरी केली जाते
Ratha Saptami 2022
Ratha Saptami 2022esakal
Updated on

माघ महिन्यातील शुक्ल सप्तमीला रथ सप्तमी साजरी केली जाते. संपूर्ण भारतभर भगवान सूर्याची जयंती म्हणून साजरी केली जाते. माघ सप्तमी, माघ जयंती आणि सूर्य जयंती या इतर नावांनी देखील ओळखले जाते

आज श्रावण शुक्ल सप्तमी आहे यालाच श्री सूर्य जयंती सुद्धा म्हणतात. याला विशिष्ट ग्रंथांचा आधार आहे. नवग्रह हे आपल्याकडे देवताच्या स्वरूपमध्ये मानले गेलेले असल्यामुळे प्रतेक देवतेचा नवग्रहांचा आपल्या जन्मतिथीचा उल्लेख जोतिष्यशास्त्र ग्रंथात आढळतो. जसे की, शनीची जयंती आहे, केतूची, राहूची त्याचप्रमाणे सूर्याची जन्मतिथी श्रावण शुक्ल सप्तमी असा उल्लेख जोतिष्यशास्त्र ग्रंथात आढळतो, आज सूर्याची जयंती आहे याविषयी आपण जाणून घेणार आहोत.

या जयंती दिवशी ज्यांच्या जन्मकुंडलीमध्ये सूर्याची स्थिति वाईट असेल तर आशा लोकांना आयुष्यात काही त्रास जाणवतो. सूर्य कोण-कोणत्या गोष्टींचा तारक आहे हे ज्योतिषशास्त्रामध्ये व्यक्तिचा स्वभाव कसा आहे, दुष्ट स्वभाव आहे की सुस्वभाव आहे, आत्मिक शक्ति त्या व्यक्तिमद्धे किती आहे, आत्मिक सामर्थ्य कसं आहे त्याचप्रमाणे रोगप्रतिकरक शक्ति कशी आहे, शरीर निरोगी राहणार आहे का? की त्या व्यक्तीला पुढे काही आजार होणार आहे तसेच पित्याचा कारक ग्रह सुद्धा सूर्यात सांगितला आहे. आयुष्यात संपत्ति, लक्ष्मी, पैसा एखाद्या व्यक्तीला किती मिळणार आहे हे त्याच्या जन्मकुंडलीतील सूर्याच्या स्थितीवरून सांगितले जाते.

Ratha Saptami 2022
Panchang 4 August 2022:पिवळे वस्त्र परिधान करणे आज शुभ ठरेल

जर पत्रिकेतील सूर्य आपल्या विपरीत बाजूला असेल तर त्याच वाईट फळ आपल्याला भोगाव लागतं. जर पत्रिकेमध्ये सूर्य बिघडला तर पचनसंबधीचे आजार होतात. हाडांच्या तक्रारी, फिट येणं त्याचबरोबर डोळ्यांच्या तक्रारी, भूक न लागणं इत्यादि अनेक प्रकारच्या तक्रारी जाणवू लागतात. तसेच मानसिक दृष्ट्या एकटेपणा जाणवतो. तर अशा लोकांनी ज्यांना हे त्रास होत आहेत त्यांनी या सूर्य जयंतीचा फायदा घेऊन सूर्याला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय करायचे आहेत.

1) सकाळी उठल्यावर सूर्याला अर्घ्य द्या.

2) तांब्याच्या पत्रामध्ये केशर किवा लाल फूल, अष्टगंध, अक्षता हे द्रव्य टाकून 'ॐ सूर्याय नंम:' म्हणून सूर्याला तीन अर्घ्य द्यावे.

3) त्याचबरोबर आज काहीतरी दान करा. गहू, तूप, गूळ इत्यादि सुवर्णदान दिवसभरात कधीही करावे.

4) सूर्याला जल अर्पण केल्यानंतर रथ सप्तमीला तुपाचा दिवा लावून पूजा करावी.

5) रथ सप्तमीला सूर्य सहस्रनाम, सूर्यशक्ती आणि गायत्री मंत्राचा जप करणे शुभ मानले जाते.

या गोष्टींमुळे जीवनातील सूर्याची स्थिति सुधारते आणि त्याचे चांगले फळ मिळते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.