Datura Flower: धोतऱ्याच्या फुलांचं ज्योतिष शास्त्रातील महत्व, का आहे धोतरा फूल महादेवाला प्रिय

धोतऱ्याचे फूल प्रसाद म्हणून हे फळ खाता येत नाही. विषारी असलं तरी या फळाचे अनेक फायदे आणि महत्व आहे
Datura Flower importance
Datura Flower importanceEsakal
Updated on

हिंदू धर्मामध्ये अनेक लाखो देव-देवता आहेत. प्रत्येक देवतेचं विषेश असं महत्व असून प्रत्येक देवतेला विविध पदार्थ आणि वस्तू तसचं अलंकार आणि शस्त्र प्रिय आहेत. त्यातप्रमाणे या प्रत्येक देवतांना खास असं फूलही प्रिय असल्याचं पुराणांमध्ये आढळतं.

प्रत्येक फुलाचं ज्योतिष शास्त्रामध्येही वेगवेगळं महत्व आहे. या फुलांपैकीचं एक म्हणजे धोतऱ्याचं फूल. Religious News Marathi Why Dhotra Flower liked by Bhagwan Mahadev

धोतरा हे महादेवाला Bhagwan Mahadev अत्यंत प्रिय आहे. धोतऱ्याचं फूल Flower महादेवाला अर्पण केल्याशिवाय महादेवाची पूजा पूर्णचं होवू शकत नाही. या फूलाची खासियत म्हणजे हे फळाची कोणत्याही ठिकाणी अगदी सहज उगतं शिवाय हे फळ विषारी Poisonous असतं.

धोतऱ्याचे फूल प्रसाद म्हणून हे फळ खाता येत नाही. विषारी असलं तरी या फळाचे अनेक फायदे आणि महत्व आहे. धोतऱ्याच्या फळाप्रमाणेच धोतऱ्याचं फूलही खूप खास आहे. ज्योतिष शास्त्रामध्ये या फूलाला खास महत्व आहे. 

कसं असतं धोतऱ्याचं फूल?

धोतर्‍याच्या फुलाचा रंग साधारणपणे पांढरा असतो. हा रंग महादेवाला अति प्रिय आहे. धोतऱ्याच्या फुलांना कोणताही सुगंध नसतो. काही ठिकाणी ही फूल हलक्या जांभळ्या किंवा पिवळ्या रंगाचं आढळतं. हे फूल तोडल्यानंतर लगेचचं कोमेजतं. त्यामुळे ते लगेचच देवाला अर्पण करावं लागतं. 

हे देखिल वाचा-

Datura Flower importance
Bhagwan Mahadev: भगवान महादेवाच्या ‘या’ प्रतीकांचा तुमच्या Life शी काय आहे संबध? जाणून घ्या प्रतिकांचं रहस्य

महादेवाला धोतऱ्याचं फळ आणि फूल का आहे प्रिय?

ज्यावेळी समुद्र मंथन झालं त्यावेळी समुद्राच्या पोटातून हलागल म्हणजेच विषाने भरलेलं कलश बाहेर आलं. त्यावेळी सर्व देव हे विष कोण प्राशन करणार हा विचार करू लागले.

यावेळी महादेवाने हे विष ग्रहण केलं आणि आपल्या कंठात साचवलं. यामुळे धोतरा हे फळ विषारी असल्याने त्याला विषाचं प्रतिकात्मक स्वरुप म्हणून भगवान महादेवाला अर्पण केलं जातं. तसचं धोतऱ्याचं फूलही महादेवाला अर्पण केलं जातं. 

धोतऱ्याचं फळ विषारी असल्याने ते महादेवाचा प्रसाद म्हणून ग्रहण करणं शक्य नसलं तरी महादेवाच्या चरणात वाहिलेलं धोतऱ्याचं एक फूल तुम्ही तुमच्याजवळ नक्कीच ठेवू शकता. यामुळे महादेवाचा आशिर्वाद तुमच्यावर कायम राहिलं.

धोतऱ्याच्या फूलाचं काय करावं?

- धोतऱ्याचं फूल तुम्ही तुमच्या एखाद्या पुस्तकात ठेवू शकता. हे फूल वाळलं तरी तुम्ही ते जवळ ठेवू शकता. यामुळे ज्ञानवृद्धी होण्यास मदत होईल.

- धोतऱ्याचं फूल तुम्ही तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता. यामुळे तुमची आर्थिक स्थिती चांगली राहण्यास मदत होईल. 

- झोपल्यावर जर तुम्हाला भितीदायक स्वप्न येत असतील तर उशीखाली धोतऱ्याचं फूल ठेवून झोपावं. यामुळे भिती दूर होईल. 

- तुम्हाला जुनं धोतऱ्याचं फूल फेकायचं असल्यास ते कुठेही फेकू नये. एखाद्या पवित्र नदीच्या प्रवाहामध्ये त्याचं विसर्जन करावं. 

धोतऱ्याचं फळ हे विषारी असलं तरी ते महादेवाला प्रिय आहे. या सृष्टीत ज्या सजीवाला समाजाने नाकारलं त्या प्रत्येकाला महादेवाने आपल्या जवळ स्थान दिलं. म्हणून कदाचित त्यांना भोला भंडारी म्हणून संबोधलं जावू लागलं. 

टीप - हा लेख सर्वसाधारण माहितीवर आधारित आहे. अंधश्रद्धेला पाठिंबा देण्याचा हेतू या मागे नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()