Shani Mandir Upay : बऱ्याच लोकांना शनिच्या प्रकोपामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. साडेसाती, शनिची महादशा अशा शब्दांचाही लोकांना धाक वाटतो. पण खरतर शनि कर्मानुसार फळ देतो. म्हणूनच शनिला न्यायाची देवता म्हटले जाते. म्हणूनच शनिदोष, साडेसाती यामुळे होणाऱ्या त्रासातून मुक्ती मिळवण्यासाठी काहीतरी उपाय करायला हवे असतात.
यासाठी शनिचे काही खास मंदिर आहेत जिथे दर्शन घेतल्याने या त्रासांतून सुटका होते असं मानलं जातं. जाणून घेऊया या प्रसिद्ध मंदिरांविषयी.
शनि शिंगणापुर मंदिर - शनिदेवाचं हे मंदिर महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातल्या शिंगणापूर गावात आहे. हे गाव शनि मंदिराशिवाय अजून एका कारणाने प्रसिद्ध आहे. या गावातले लोक घरांना कधीच कुलूप नाही लावत. कारण असं म्हटलं जातं इथे शनिदेवाच्या कृपेने कधीच चोरी होत नाही. जो चोरीचा प्रयत्न करतो त्याला मोठा दंड भोगावा लागतो. शनिदोष, साडेसाती निवारणासाठी लोक इथे मोठ्या संख्येने येतात.
शनिधाम मंदिर - देशाची राजधानी नवी दिल्लीच्या छतरपुरमध्ये शनिधाम आहे. इथे शनि देवाची भव्य मूर्ती आहे. इथे येऊन दर्शन, पूजा केल्याने शनिदोष दूर होतात, असं मानलं जातं.
कोकीलावन धाम - उत्तर प्रदेशमधल्या मथुरा जिल्ह्यातलं हे शनि देवाचं मंदिर कोकिलावन नावाने ओळखलं जातं. हे शनिदेवाच्या जागृत मंदिरांपैकी एक मानलं जातं. असं मानलं जातं की इथे नियमित ७ दिवस शनिदेवाला तेल वाहिल्याने शनिदोष संपतो.
शनि मंदिर - कर्नाटकातल्या तुमकुर जिल्ह्यात हे मंदिर आहे. इथे शनिदेव कावळ्यावर बसल्याची मूर्ती आहे. असं म्हणतात इथे दर्शन घेतल्यावर अडचणी दूर होतात.
तिरुनल्लरु मंदिर, तामिळनाडू - तामिळनाडूच्या तंजावूर जिल्ह्यातलं हे मंदिर २ नद्यांच्या मध्ये आहे. इथे शनिदेव आणि शंकराचीही मूर्ती आहे. शनि ग्रह गोचरच्या वेळी इथे विशेष पूजा असते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.