हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्थीस संकष्ट चतुर्थी किंवा संकष्टी चतुर्थी असे म्हणतात. यंदा श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थी ही १५ ऑगस्ट २०२२ ला असून या दिवशी एक खास योग जुळून आला आहे. दिनदर्शिकेनुसार १५ ऑगस्टला श्रावणातील तिसरा सोमवार आहे. संकष्टी चतुर्थी निमित्त गणेशाचे व श्रावणी सोमवार निमित्त गणरायाचे पिता महादेव शंकराची पूजा करून आपण या दोघांनाही प्रसन्न करू शकता. संकष्टी हा गणपतीच्या भक्तांसाठी खास दिवस असतो. यादिवशी स्त्री व पुरुष दोघेही उपवास करतात, रात्री चंद्रोदयानंतर घरातील देवाला नैवेद्य दाखवून मग दिवसभराचे व्रत सोडले जाते.
साधारणतः एका वर्षात १२ आणि अधिकमास आल्यास १३ संकष्टी चतुर्थी येतात. जर का संकष्टी चतुर्थी मंगळवारी असेल तर तिला अंगारकी चतुर्थी म्हणून संबोधले जाते. यंदा ऑगस्ट महिन्यातील संकष्टी चतुर्थीच्या दिवशीची प्रत्येक शहरातील चंद्रोदयाची वेळ आपण जाणून घेऊयात..
अहमदनगर - २१:३८
धारवाड - २१:३८
कोल्हापूर - २१:४१
परभणी - २१:३०
अकोला- २१:२९
धुळे - २१:३८
लातूर- २१:३१
पुळे - २१:४५
अमरावती - २१:२६
डाँबिवली - २१:४५
लेण्याद्री - २१:४२
रांजणगाव - २१:४०
अहमदाबाद - २१:४७
गदग - २१:३५
महड - २१:४४
रत्नागिरी - २१:४४
अलिबाग - २१:४६
गाणगापूर - २१:३१
मोरगाव - २१:४०
सांगली- २१:३९
औरंगाबाद- २१:३६
गोकर्ण - २१:४१
मुंबई- २१:४६
सातारा- २१:४१
गुलबर्गा - २१:४०
सावंतवाडी - २१:४२
बंगळूर- २१:२७
ग्वाल्हेर - २१:२३
नागपूर - २१:२०
सिद्धटेक -२१:३८
बिदर - २१:२७
हुबळी- २१:३७
नांदेड २१:२८
सोलापूर- २१:३४
बीड- २१:३४
हैदराबाद- २१:२३
नाशिक- २१:४२
ठाणे- २१:४५
बुलढाणा- २१:३२
इंदौर २१:३३
नरसोबावाडी -२१:३९
थेऊर- २१:४१
बेळगाव- २१:४०
जबलपूर- २१:१६
निझामाबाद- २१:२५
उस्मानाबाद- २१:३३
भंडारा- २१:१८
जळगाव- २१:३५
ओझर -२१:४१
वेंगुर्ले - २१:४३
भोपाळ- २१:२७
जालना- २१:३३
पाली - २१:४५
विजापूर- २१:३५
भुसावळ - २१:३४
कारवार - २१:४१
पणजी - २१:४२
वर्धा- २१:२२
चंद्रपूर- २१:१९
कल्याण -२१:४५
पंढरपूर - २१:३६
यवतमाळ २१:२४
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.