Sankashti Chaturthi : संकष्टीचं फळ हवं असेल तर, या चुका टाळा

काही पूजा, उपास हे तात्काळ फळ देणारे आणि मनोकामना पूर्ण करणारे असतात. पण त्यासाठी त्याची योग्य विधीवत पूजा होणे गरजेचं असतं.
Sankashti Chaturthi
Sankashti Chaturthi esakal
Updated on

Sankashti Chaturthi : कोणत्याही आराधनेचं, पूजेचं वांछित फळ हवं असेल तर त्यासाठी ती पूजा योग्य विधीवत होणं, सांगितलेले सर्व नियम पाळले जाणं फार आवश्यक असतं. जसे काही नियम पूजेचे आहेत तसेच काही नैवेद्याचेही आहेत.

Sankashti Chaturthi
Angarki Chaturthi: अंगारकीनिमित्त सांगलीच्या मंदिरात गर्दी

देवाची आराधना आणि पूजा केल्यानंतर सर्वात महत्वाचा असतो तो म्हणजे देवाला दाखवला जाणारा नैवेद्य किंवा प्रसाद. देवाला प्रसाद अर्पण करताना आणि केल्यानंतर काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक असतं.

Sankashti Chaturthi
Angarki Sankashti Chaturthi : 'या' चतुर्थिची कथा माहितीये? जाणून घ्या

हिंदू पौराणिक कथेनुसार भगवान गणेशाला विघ्नहर्ता किंवा सर्व अडथळे दूर करणारा म्हणून ओळखले जाते. बहुसंख्य भारतीय कोणताही नवीन उपक्रम सुरू करण्यापूर्वी देवतेची पूजा करतात. हिंदू दिनदर्शिकेनुसार चतुर्थी तिथी किंवा दर महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चौथ्या दिवशीही गणपतीची पूजा करण्यासाठी चांगला दिवस मानला जातो. हा दिवस संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखला जातो.

Sankashti Chaturthi
Angarki Sankshati Chaturthi: हेल्दी आणि टेस्टी राजगिऱ्याच्या शिरा

असा विश्वास आहे की, जे हा दिवस सर्व विधीपूर्वक पाळतात श्रीगणेश त्यांच्या जीवनातील सर्व अडथळे आणि समस्या दूर करतात. देवाची आराधना आणि पूजा केल्यानंतर सर्वात महत्वाचा असतो तो म्हणजे देवाला दाखवला जाणारा नैवेद्य किंवा प्रसाद. देवाला नैवेद्य दाखवताना कोणत्या चुका टाळाव्या आणि काय करावे याबद्दल आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

Sankashti Chaturthi
Ganesh Chaturthi 2022 : स्वयंचलितद्वारे १९ हजार मूर्ती विसर्जित

संकष्टी चतुर्थी शुभ मुहूर्त

ऑक्टोबर महिन्याच्या 13 तारखेला म्हणजेच गुरुवारी संकष्ट चतुर्थी आहे. याचदिवशी करवा चौथदेखील आहे. संकष्ट चतुर्थीचा उपवास रात्री 8. 46 वाजता चंद्राची पूजा करून आणि देवाला नैवेद्य दाखवून सोडता येईल.

Sankashti Chaturthi
Ganesh Chaturthi 2022 : चपाती-भाकरी व्यवसायातून रोजीरोटी

देवाला नैवेद्य दाखवताना या चुका टाळा

  • देवाला प्रसाद अर्पण करताना शक्यतो तेल आणि मिरचीचा वापर करू नये तर तूपाचा नैवेद्य अर्पण करावा. देवाला सात्विक अन्न आवडते.

  • देवाला नैवेद्य अर्पण केल्यानंतर तो लगेच काढू नका. नैवेद्य अर्पण केल्यावर सर्व लोकांनी काही काळ देवापासून दूर जावे आणि काही वेळाने देवाला नमस्कार करून तो प्रसाद काढता येईल.

Sankashti Chaturthi
Ganesh Chaturthi 2022 : चपाती-भाकरी व्यवसायातून रोजीरोटी
  • पूजेच्या वेळी महादेव आणि गणेशाला अर्पण केलेल्या भोगामध्ये तुळशी पत्र टाकले जात नाही. महादेवाला बेलपत्र अर्पण करणे शुभ मानले जाते. तर गणेशाला दुर्वा अर्पण केल्याने ते प्रसन्न होतात.

  • देवाला शिजवलेले अन्न अर्पण करावे, पूजेनंतर त्यातील काही भाग काढून गायीला खाऊ घालावा. नंतर तो प्रसाद स्वतः स्वीकारावा आणि इतरांनाही वाटावा. असे केल्याने देव प्रसन्न होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.