भगवान जगन्नाथांची रथयात्रा का काढली जाते?जाणून घ्या महत्वपूर्ण कारण

रथयात्रेमागच्या या चार कारणांनी जगन्नाथ यात्रा महत्त्वाची ठरते.
Know How jagannath Rath Yatra Started
Know How jagannath Rath Yatra Startedesakal
Updated on

जगन्नाथ रथयात्रा दवर्षी आषाढ (जुलै) शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी निघते.या वर्षी १ जुलै २०२२ म्हणजे आजच रथयात्रा निघाली आहे.रथयात्रेमागच्या या चार कारणांनी जगन्नाथ रथयात्रा महत्त्वाची ठरते.आणखी एक आख्यायिका अशी आहे की, गुंडीचा मंदिरात देवी श्रीकृष्णाची मावशी आहे. त्यांनी तिन्ही भावंडांना आपल्या घरी येण्यास आमंत्रित केले. तेव्हा श्रीकृष्ण बलराम आणि सुभद्रासमवेत मावशी घरी दहा दिवस राहिले होते.

तिसरी आख्यायिका अशी आहे की, श्रीकृष्णाचे मामा कंस त्यांना मथुरेला बोलावतात. यासाठी कंस सारथीसह एक रथ गोकुळला पाठवतो. कृष्ण आपल्या भाऊ व बहिणीसह रथात मथुराला जातो. तेव्हापासून रथयात्रा सुरू झाली. तथापि, काही लोक असेही मानतात की, या दिवशी कृष्णाने कंसाचा वध केला आणि मोठ्या भावाने बलरामाने प्रजेला दर्शन देण्यासाठी मथुरेत रथयात्रा काढली.

Know How jagannath Rath Yatra Started
Jagannath Rath Yatra 2022: जगन्नाथाचे मंदिर बाराव्या शतकात कोणी बांधले?

चौथ्या आख्यायिकेनुसार, कृष्णाच्या राण्यांनी माता रोहिणीला रासलीला ऐकवण्याची विनंती करतात. आईला वाटते की, सुभद्राने गोपिकांसह कृष्णाची रासलीला ऐकू नये, म्हणून कृष्ण आणि बलराम यांच्यासह ती त्यांना रथयात्रेवर पाठवते. मग नारदजी तिथे येतात आणि तिघांना एकत्र पाहून आनंदित होतात. या तिघांनीही दरवर्षी याप्रमाणे दर्शन द्यावे ही प्रार्थना करतात. तेव्हापासून तिघांचेही दर्शन होते.

बलराम-सुभद्रा जेव्हा समुद्रात उडी घेतात

असे मानले जाते की,श्रीकृष्णाच्या मृत्यूनंतर त्यांचे पार्थिव द्वारकाला आणण्यात आले.नंतर बलराम भावाच्या मृत्यूने दु:खी होऊन कृष्णाच्या पार्थिवासह समुद्रात उडी घेतात, सुभद्रादेखील मागोमाग उडी घेते. यादरम्यान भारताच्या पूर्वेकडील पुरीचा राजा इंद्रद्विमुना स्वप्न पाहतो की, कृष्णाचे पार्थिव समुद्रात तरंगत आहे, त्याने येथे कृष्णाचा विशाल पुतळा बांधावा आणि मंदिर बांधावे. स्वप्नात देवदूत सांगतात की, 'कृष्णासमवेत बलराम सुभद्राची लाकडी मूर्ती बनवा आणि श्रीकृष्णाच्या अस्थी पुतळ्याच्या मागे छिद्र करून ठेवाव्यात.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.