Shani Dev: ‘या’ खास लोकांवर राहते शनिदेवाची कृपा

या खास लोकांच्या काही खास सवयी असतात ज्यामुळे शनिदेव नेहमी त्यांच्यावर प्रसन्न राहतो.
shani dev
shani devsakal
Updated on

शनिवारचा दिवस हा खास शनि देवाचा दिवस असतो. शनिदेव हा न्याय देवता म्हणून सुद्धा ओळखला जातो. यामुळे त्याला कर्मफलदातासुद्धा म्हणतात. शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. पण तुम्हाला माहिती आहे का की काही खास लोकांवर शनिदेवांची सदैव कृपा असते. कारण या खास लोकांच्या काही खास सवयी असतात ज्यामुळे शनिदेव नेहमी त्यांच्यावर प्रसन्न राहतो. (shani dev show grace on these special people)

shani dev
Shani Dev: ‘या’ पाच राशींवर शनि पडणार भारी

स्वत:ला स्वच्छ ठेवणे

दररोज अंघोळ करणाऱ्यांवर सोबत स्वत:ला स्वच्छ ठेवणाऱ्यांवर शनिदेवाची कृपा असते. जे लोक नखे कापतात आणि साफ ठेवतात त्या लोकांची शनि देव विशेष काळजी घेतात.

 दान करणे 
नेहमी गरजू किंवा गरीब लोकांना मदत करणाऱ्यांवर शनिदेवाची विशेष कृपा असते. जर तुम्ही गरीबांना काळे चणा, काळे तीळ, किंवा उडिद दाळ, कपड़े, छत्री, बुट साफ मनाने दान करतात त्या लोकांचे शनिदेव नेहमी कल्याण करतात.

shani dev
Shani dev transit 2022 : २०२३ पर्यंत शनिदेव या राशींवर राहणार प्रसन्न

आजारी लोकांची सेवा करणे

शनि देव स्वत: हळू हळू चालतात यामुळे दिव्यांग लोकांची काळजी घेणाऱ्या लोकांवर ते विशेष कृपा दाखवतात. दिव्यांगचा अपमान हा शनिदेवाचा अपमान समजला जातो.  कुष्ठ रोगांची सेवा करणाऱ्यांवर शनि देव नेहमी प्रसन्न राहतात.

 सफाई कर्मचाऱ्यांची मदत करणे

जे सफाई कर्मचाऱ्यांचा आदर करतात, त्यांना आर्थिक मदत करतात अशा लोकांचा शनिदेव कधीच साथ सोडत नाही. ही चांगली सवय तुम्हाला असेल तर कधीच सोडू नका शनिदेव या सवयीपासून खुप प्रसन्न होतात.

 श्वानांची सेवा
श्वानांची सेवा करणाऱ्यांवर शनिदेव सदैव प्रसन्न होतात. श्वानांना जेवण दिल्याने तुमच्या आयुष्यातील अडचणी दुर होतील. जर तुम्ही श्वानांवर प्रेम करत असाल तर शनि देवांची तुमच्यावर सदैव कृपा राहणार.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()