Navratri Festival : दीड तासांत मिळतंय अंबाबाईचं दर्शन; मुस्लिम बांधवांकडून भाविकांना केलं जातंय पाणी वाटप

Sharadiya Navratri Festival : नवरात्रोत्सवाच्या पाचव्या दिवशी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली.
Ambabai Temple Kolhapur
Ambabai Temple Kolhapuresakal
Updated on
Summary

श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना उन्हाच्या झळा लागू नयेत, यासाठी मुस्लिम समाजाने शुद्ध पाण्याचे वाटप केले.

कोल्हापूर : शारदीय नवरात्रोत्सवाच्या (Sharadiya Navratri Festival) पाचव्या दिवशी करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची (Ambabai Devi) पूजा सरस्वती रूपात बांधण्यात आली. शुभ्र कमलावर शुभ्र वस्रामध्ये विराजमान झालेल्या देवीच्या हातामध्ये अक्षर ब्रह्माचे प्रतीक म्हणून पोथी तर नादब्रह्माचे प्रतीक अशी वीणा तर सातत्यपूर्ण अनुसंधानाचे प्रतीक म्हणून अक्षमाला अर्थात जपमाळा धारण करणारी सरस्वती ज्ञानाची देवता आहे. तिचे वाहन हंस म्हणजे निरक्षीर विवेक बुद्धीचे प्रतीक अशा सरस्वतीला शारदा म्हणून ओळखले जाते. ही पूजा विद्याधर मुनीश्वर, मयूर मुनीश्वर व अरुण मुनीश्वर यांनी बांधली.

नवरात्रोत्सवाच्या पाचव्या दिवशी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली. काकड आरतीपूर्वीच महिला भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या. परिणामी, पहाटेच दर्शनरांग शेतकरी संघाच्या इमारतीत जाऊन पोहोचली. देवीचे दर्शन तासा-दीडतासात मिळावे, अशी व्यवस्था देवस्थान समितीने केली आहे. रविवारपासून गर्दी वाढण्याचा अंदाज असल्याने पितळी उंबऱ्याच्या बाहेरूनच देवीचे दर्शन घेतले जाते.

तसेच व्हीआयपी व्यक्ती दर्शनाला आल्यानंतर दर्शनरांग थांबविली जात होती. तेही बंद करण्यात आले असून, आरतीच्या वेळीही दर्शनरांग सुरू ठेवली जाते. याचा परिणाम म्हणून आज दिवसभरात सरलष्कर भवन येथील दर्शनरांगेपर्यंतच भाविक पोहोचले होते. मुख्य दर्शनरांगेत भाविकांची संख्या कमी आणि मुख दर्शन रांगेत संख्या जास्त असे चित्र आज दिवसभर राहिले. रात्री झालेल्या पालखी सोहळ्यालाही भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली.

Ambabai Temple Kolhapur
'उत्तरे'त ठिणगी, 'दक्षिणे'त वणवा; खासदार महाडिक-क्षीरसागर यांच्यातील वादाला तोंड फुटण्याची शक्यता, काय आहे कारण?

काल पालखी कमळाच्या आकारात विविध फुलांनी सजविली होती. दरम्यान, ऐतिहासिक भवानी मंडपातील तुळजाभवानी मंदिरात देवीची वनविहार करतानाच्या रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली. देवीची पालखी आज पद्मावती मंदिरात भेटीसाठी गेली. दिवसभर भजन व कविता नायर व त्यांच्या शिष्यांनी भरतनाट्यम नृत्य सादर केले.

सचिवांचे दर्शनरांगेतून दर्शन

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे अंबाबाई मंदिरात भाविकांना दर्शनरांगेत सुविधा मिळतात का?, याची माहिती घेण्यासाठी गर्दीच्या वेळी दर्शनरांगेतून देवीच्या दर्शनासाठी येतात. गेले दोन दिवस त्यांचा हा शिरस्ता असून, देवस्थान समितीकडून भाविकांची काळजी घेण्याविषयी प्रयत्न सुरू आहेत.

Ambabai Temple Kolhapur
आपण आपल्याच भाषेला दुय्यम का मानायचं? मराठीबद्दल अस्मिता हवीच; काय म्हणाल्या ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर?

मनसेतर्फे अन्नछत्राची सुरुवात

मनसेतर्फे मोफत अन्नछत्राची सुरुवात भवानी मंडप, मेन राजाराम हायस्कूल येथे युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांच्या हस्ते झाली. हे अन्नछत्र दररोज सकाळी अकरा वाजता सुरू होणार आहे. यावेळी आयोजक विजय करजगार, मुद्रांक जिल्हाधिकारी बाबासाहेब वाघमोडे, मोहन मुल्हेरकर, मकरंद मुल्हेरकर, विक्रम जाधव, बलराम वराडे, शिरीष कुंदे, संजीव पारीख, प्रा. डॉ. गजानन खाडे उपस्थित होते.

मुस्लिम समाजाकडून भाविकांना पाणी वाटप

श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना उन्हाच्या झळा लागू नयेत, यासाठी मुस्लिम समाजाने शुद्ध पाण्याचे वाटप केले. यावेळी अख्तर इनामदार, रियाज सुबेदार, सलीम सय्यद, तौफिक मुल्लाणी, सलीम मुल्ला, वसिम चाबुकस्वार, ताहीर मुजावर, पप्पू शेख, मुजीब महात, युनूस नदाफ, उमर सय्यद, साहिल शेख उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.