Signs Of Death : मृत्यू हा अटळ असतो. जगात कोणत्याही जीवाने जन्म घेतला की त्याचा मृत्यूही निश्चित आहे. मृत्यू कधी आणि कसा होईल याबाबत आपण सांगू शकत नाही. मात्र मृत्यूशी संबंधित हे गहन रहस्य शिवपुराणात सांगण्यात आले आहे.
या पुराणात भोलेनाथांनी एकदा माता पार्वतीला मृत्यूपूर्वी दिसणार्या लक्षणांबद्दल सांगितले. या चिन्हांद्वारे, मनुष्याला आधीच कळते की आता त्याचा मृत्यू जवळ आला आहे. अशा स्थितीत त्याने भगवंताचे स्मरण सुरू केले पाहिजे जेणेकरून शेवटचा काळ सुखदायक जाईल. चला तर मृत्यूपूर्वी माणसाला कोणती लक्षणं दिसतात ते जाणून घेऊया.
शिवपुराणात भोलेनाथांनी माता पार्वतीला मृत्यूचे रहस्य सांगितले की, जर कोणाच्या जीभ, नाक, कान आणि तोंडाला थरथराट सुटला असेल तर तो 6 महिन्यांच्या आत मरतो. अशा स्थितीत माणसाने भगवंताचे स्मरण सुरू केले पाहिजे.
भगवान शिव म्हणतात की जर एखाद्या व्यक्तीला आरशात, तेलात आणि पाण्यात आपले प्रतिबिंब दिसणे अचानक बंद झाले तर त्याने समजावे की त्याचा मृत्यू जवळ आहे. अशा स्थितीत त्याने आपला वेळ देवपूजेत घालवावा.
शिवपुराणानुसार एखाद्या व्यक्तीच्या डोक्यावर कबूतर किंवा गिधाड बसले तर ते मृत्यूचे लक्षण दर्शवते. हे संकेत तुमच्या आयुष्यात काहीतरी अनर्थ घडणार असल्याचे दर्शवते. (Life)
पुराणात असे म्हटले आहे की जर एखाद्या व्यक्तीचे शरीर अचानक पिवळे किंवा पांढरे झाले तर ते त्याचा शेवटचा काळ जवळ आल्याचे लक्षण आहे. या दरम्यान, शरीरावर लाल पुरळ देखील दिसतात. (Astrology)
शिवपुराणानुसार, जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू अगदी जवळ येतो तेव्हा त्याची दृष्टी अचानक खूप कमकुवत होते. त्याच्या आजूबाजूच्या व्यक्ती त्याला नीट दिसत नाहीत. त्याला आजूबाजूला अंधार दिसू लागतो.
डिस्क्लेमर - वरील लेख सामान्य माहितीवर आधारित असून सकाळ समुह याची पुष्टी करत नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.