Shravan 2022 Shri Kholeshwar Maharaj Sansthan mahadev temple
Shravan 2022 Shri Kholeshwar Maharaj Sansthan mahadev temple

श्री खोलेश्वर महाराज संस्थान श्रावणात शिवमय

भाविक भक्तांच्या नवसाला पावणारे जागृत देवस्थान; हजारो भाविकांनी घेतले दर्शन
Published on

बार्शीटाकळी : अकोल्या पासून १८ कि.मी अंतर असलेल्या बार्शीटाकळी येथील श्री खोलेश्वर मंदीर शहरातून दक्षिण उत्तर दिशेने वाहणाऱ्या विदृपा नदीच्या काठावर बसलेल आहे. बाराव्या शतकातील हेमांडपंथी श्री खोलेश्वर मंदीर असून, पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेले शहराचे आराध्य दैवत, व जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाते.

श्री खोलेश्वर महाराज मंदीराचे आतील व बाह्य भागातील संपूर्ण बांधकाम दगडांवर सुंदर कोरीव व रेखीव नक्षीदार कलाकृतीने केलेले आहे. मंदीराच्या गाभाऱ्यातील छताला व खांबावर नक्षीदार कलाकृतीने घडवलेले आहे. मंदीरात एक अजूनही अदभूत कलाकृतीने घडवलेले शिल्प आहे. त्यामध्ये मनुष्याचे एक मुख असून, त्याला वेगवेगळ्या दिशेने पाच मानवी धड जोडलेली आहेत. कुठल्याही दिशेने पाहल्यास अखण्ड मानवी मूर्तीचे दर्शन घडते. संपूर्ण मंदिराचे बांधकाम पाशानातच केलेले असल्याचे दिसते. मंदिरात प्रवेश करताच नंदी महाराजाचे दर्शन होते.

मंदिराचा मुख्य गाभारा अंदाजे विस फुट खोल असून, खाली जागृत स्वयंभू शिवलिंग आहे. त्यामधून कायम स्वरूपी चौवीस तास गंगा रुपी पाणी वाहत असते. पश्चिमेच्या गाभाऱ्यात काळ्या पाषाणातील गणेश मूर्ती कमळाच्या पुष्पावर विराजमान आहे. मंदीराच्या आवारातच श्री दत्त मंदीर, बाहेरील प्रागंणात श्री गुरु गोविंद महाराज यांचे समाधी मंदीर आहेत. पश्चिमेला श्री हनुमंतीची मोठी पाच फुट उंची असलेली मूर्ती एकत्रित असलेल्या पिपंळ, निंब, वडाच्या वृक्षाखाली विराजमान आहे. मंदिराच्या मागच्या बाजूस गेल्यास एक मोठा बुरुज आहे.

नदीला येणाऱ्या पुराच्या पाण्यापासून मंदीराचे संरक्षण करतो. मंदीराला पाच घुमट आहेत. त्या पाचही घुमटाला पितळी कळस लावलेले दिसतात. श्री खोलेश्वर स्थानमध्ये वर्ष भर विविध धार्मिक कार्यक्रम सुरू असतात. महाशिवरात्री व खोलेश्वर महाराज यात्रा महोत्सव मोठ्या हर्षे उल्हासात साजरा करण्यात येतो.

यावेळी श्री खोलेश्वर महाराज संस्थानच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. वर्षभर मंदीरात दर्शन घेण्याकरिता भाविक भक्त दूर वरून येतात. श्रावण महिन्यात दर सोमवारी मंदीराचा परीसर शिवमय होतो. कावडधारी शिवभक्त नद्यांच्या संगमावरून कावडने पाणी आणून हर्र बोला महादेवच्या उदघोषात शिवलींगावर जलाभिषेक करतात.

अखंड बेलपत्र वाहण्यास सुरुवात

श्रावण मासा निमीत्त दर वर्षी प्रमाणे याही वर्षी अखंड बेलपत्र वाहण्याचा (लाखोलिचा कार्यक्रम) रविवार, ता. ७ ऑगस्ट रोजी स. ८ वाजतापासून सुरू झाला. हा कार्यक्रम अखंड सुरू राहणार असून, समाप्ती रविवार, ता. १४ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वा. करण्यात येईल. शिव भक्तांनी बेलपत्र वाहण्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदीर व्यवस्थापनाने केले आहे. बेलपत्राची व्यवस्था मंदिरात करण्यात आलेली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()