Shravan 2023 : भगवान शिवशंकरांना पहिल्यांदा कावड अभिषेक कोणी घातला? या परंपरेचं महत्त्व काय!

Shravan 2023
Shravan 2023esakal
Updated on

Shravan 2023 : लवकरच श्रावण महिन्याला सुरूवात होणार आहे. सध्या अधिक महिन्याला सुरूवात झालीय. पण अधिक श्रावण सगळेच पाळत नाहीत. त्यामूळे पुढील महिन्यात श्रावणाला सुरूवात होईल.

महाराष्ट्रात १७ ऑगस्टला श्रावण महिन्याला सुरूवात होईल. श्रावणाच्या प्रत्येक सोमवारी भगवान शिवाची पूजा करणं महत्वाचं मानलं जातं. श्रावणात महादेवांना अभिषेक घातला जातो. त्यामूळे हा महत्त्वाचा महिना मानला जातो. (Shravan2023)

पवित्र महिन्यात शिवलिंगाची पूजा करणे खूप फायदेशीर आहे. कावडचे पाणी आणून शिवशंकरांना अभिषेक करण्याची परंपरा केव्हा व कशी सुरू झाली, अशी पौराणिक कथा आहे.( Shravan 2023 : Ravana had anointed Shiva for the first time from Kanwar, the reason was very special)

Shravan 2023
Adhik Shravan Maas : श्रावण सोमवारचा उपवास सोडण्यासाठीची खास स्वीट डिश, लगेच नोट करा रेसिपी

कावड यात्रा कोणी सुरू केली

कावड यात्रेबद्दल अनेक पुराण कथा आहेत. या कावड यात्रांचा प्रारंभ बिंदू वेगवेगळ्या कारणांमुळे आणि वेळा बदलत होता. वेगवेगळ्या कथांनुसार, भगवान श्री राम, लंकापती रावण, परशुराम, श्रावणबाळ यांनी कावड यात्रा सुरू केली. (Lord Shiva)

श्रावणबाळाने त्यांच्या आई वडिलांना देवदर्शनाला जाताना आई-वडिलांना कावडमध्ये बसवून नेलं. तसेच ती कावड खांद्यावरून नेत आई वडिलांना देवदर्शन घडवलं. या काळापासूनच कावड यात्रा सुरू झाल्याचे मानले जाते. त्याचबरोबर भगवान शंकर आणि लंकाधिपती रावणाशी संबंधित एक पौराणिक कथाही या ठिकाणी प्रचलित आहे.

Shravan 2023
Shravan 2023 : तूम्ही एक महिना कांदा लसूण खाऊ नका, बघा किती फायदे आहेत ते!

लंकाधिपती रावणाची कावडाची पौराणिक कथा

समुद्र मंथनातून मिळालेलं अमृत देवांनी प्यायलं आणि ते अमर झाले. मात्र त्याच समुद्रमंथनातून निघालेलं विष कोण पिणार असा प्रश्न जेव्हा निर्माण झाला तेव्हा भगवान महादेवांनी हे आव्हान स्विकारलं होतं आणि त्यांनी हे हलाहल प्राशन केलं होतं.

मात्र हे विष प्राशन केल्यानंतर महादेव त्याच्या प्रभावाने तडफडू लागले. हे विष पचवणं त्यांच्यासाठी आव्हानापेक्षा कमी नव्हतं. मात्र त्यांची होत असलेली तडफड त्यांच्या परमभक्ताला पाहावली नाही.

Shravan 2023
Shravan fasting Recipe : उपवासाला कधी अप्पे खाल्लेत का? ही घ्या टेस्टी बटाट्याच्या अप्प्यांची सोपी रेसिपी

आपल्या देवाची होत असलेली तडफड पाहून रावणाने मग महादेवांवर कावडीने पाणी आणून ओतायला सुरूवात केली. अनेक वर्ष रावणाने हे काम केलं आणि अखेर महादेवांची तडफड थांबली आणि ते पूर्ववत झाले.

तेव्हापासून कावडेतून येथून शिवजींनी आणलेल्या शोभायात्रेने श्रावण महिन्यात अभिषेक करण्याची परंपरा सुरू झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()