Shravan 2023 : यंदा श्रावणी सोमवार ४ नाही तर ८ असणार, जाणून घ्या सविस्तर

यंदाचा श्रावण महिना इतर वर्षांपेक्षा खास आहे. कारण १९ वर्षांनंतर श्रावण १ नाही तर २ महिन्यांचा असणार आहे.
Shravan 2023
Shravan 2023esakal
Updated on

Sawan Month 2023 : हिंदू धर्मात श्रावण महिन्याचं विशेष महत्व आहे. मान्सुनचे वेध लागले की, शिव भक्तांना श्रावणाचे वेध लागतात. अशा सर्व शिवभक्तांसाठी ही आनंदाची बातमी आहे की, यंदाता श्रावण महिना १ नाही तर २ महिन्यांचा असणार आहे. त्यामुळे यंदा श्रावणी सोमवारही ४ ऐवजी ८ येणार आहेत.

हा योग तब्बल १९ वर्षांनी आला आहे. तर यंदा किती ते किती असणार श्रावण महिना आणि श्रावणी सोमवारच्या तिथी जाणून घेऊया.

हिंदू पंचांग

हिंदू पंचांगानुसार श्रावण हा पाचवा महिना असतो. यात श्रावणी सोमवारला विशेष महत्व असतं. या दिवशी उपास ठेवून शंकराचे व्रत करणे फार फलदायी समजले जाते.

सुरूवात कधी?

यंदा २ महिने चालणारा हा श्रावण दिनांक ४ जुलैपासून सुरू होत आहे. तर ३१ ऑगस्टला संपणार आहे.

Shravan 2023
Hindu Religion : जगन्नाथ मंदिराचे हे रहस्य सांगत अशा अज्ञात ऊर्जेविषयी, जी समजणे अशक्य

श्रावणी सोमवारच्या तिथी

पहिला सोमवार - १० जुलै

दुसरा सोमवार - १७जुलै

तिसरा सोमवार - २४ जुलै

चौथा सोमवार - ३१ जुलै

पाचवा सोमवार - ७ ऑगस्ट

सहावा सोमवार - १४ ऑगस्ट

सातवा सोमवार - २१ ऑगस्ट

आठवा सोमवार - २८ ऑगस्ट

Shravan 2023
Hindu Religion Janeu : जानवे का घालतात? जाणून घ्या फायदे

श्रावणी सोमवाराचे महत्व

श्रावण महिना हा भगवान शंकराला सर्पित असतो. याकाळात भक्तगण शंकराची आराधना करतात, व्रत ठेवतात.

भगवान शंकराला या काळात अभिषेक केला जातो. बेलपत्र, शमी पत्री वाहण्याचे विशेष महत्व आहे.

अविवाहित मुली या महिन्यापासून इच्छित वर मिळवण्यासाठी सोळा सोमवारच्या व्रताचा प्रारंभ करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.