Sawan Purnima 2023 : श्रावण पौर्णिमा नेमकी कधी आहे 30 की 31 ऑगस्ट? जाणून घ्या कोणत्या दिवशी करावा उपवास

Sawan Purnima 2023 Date : या वर्षी श्रावण पौर्णिमा तारीख 30 ऑगस्ट आणि 31 ऑगस्ट अशी दोन दिवस आहे. पण अशा परिस्थितीत कोणत्या दिवशी उपवास करावा? याबाबत गोंधळ निर्माण झालाय का?
Sawan Purnima 2023
Sawan Purnima 2023 Sakal
Updated on

हिंदू धर्मात श्रावण पौर्णिमा खूप महत्त्वाची मानली जाते, कारण या दिवशी रक्षाबंधन हा सण देखील साजरा केला जातो. याला श्रावणी पौर्णिमा असेही म्हणतात. ही पौर्णिमा म्हणजे नद्यांमध्ये स्नान करणे, दान करणे आणि शिवपूजनासाठी सर्वोत्तम तिथी मानली जाते.

या पौर्णिमेच्या रात्री लक्ष्मीची पूजा करणाऱ्या भाविकांना कधीही पैशाची कमतरता भासत नाही, असे मानले जाते. पण यावर्षी श्रावण पौर्णिमा ही दोन दिवसांची आहे, अशा परिस्थितीत कोणत्या दिवशी उपवास करावा आणि नद्यांमध्ये स्नान करणे योग्य ठरेल? चला जाणून घेऊया सविस्तर माहिती...

Sawan Purnima 2023
Nag Panchami 2023 : नागपंचमी स्पेशल - हळदीच्या पानातील पातोळ्याची रेसिपी VIDEO, जाणून घ्या आरोग्यवर्धक फायदेही

श्रावण पौर्णिमा नेमकी कधी आहे, 30 ऑगस्ट की 31 ऑगस्ट? (When is Shrava Purnima 30August or 31 August)

पंचांगातील माहितीनुसार, श्रावण पौर्णिमा तिथी 30 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 10.58 वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 31 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 07.05 वाजता समाप्त होईल.

कधी करावा उपवास?  - श्रावण पौर्णिमेचा उपवास, सत्यनारायणाची कथा  आणि लक्ष्मीदेवीची पूजा 30 ऑगस्टला करा. कारण या दिवशी पौर्णिमा तिथी संपूर्ण दिवस व रात्रभर राहील. पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी पूजन आणि रात्री चंद्राला अर्घ्य देण्याचा विधी आहे.

Sawan Purnima 2023
Raksha Bandhan 2023 : आपल्या लाडक्या भावासाठी राखी खरेदी करतांना कोणती काळजी घ्यावी?

स्नान - दान : पौर्णिमेच्या दिवशी करावयाचे स्नान 31 ऑगस्ट 2023 रोजी केले जाऊ शकते. धार्मिक ग्रंथांनुसार पौर्णिमेच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर नदीत स्नान करण्याची परंपरा आहे, त्यामुळे पुण्य प्राप्त होते, असे मानले जाते.

श्रावण पौर्णिमा 2023 मुहूर्त (Sawan Purnima 2023 Muhurat)

  • स्नान-दान - पहाटे 04.28 वाजल्यापासून ते पहाटे 05.13 वाजेपर्यंत

  • सत्यनारायण पूजा - सकाळी 07. 34  वाजल्यापासून ते सकाळी 9.10  वाजेपर्यंत

  • चंद्रोदयाची वेळ - संध्याकाळी 0.6.35

  • लक्ष्मीपूजन - रात्री 11.59 वाजल्यापासून ते दुसऱ्या दिवशी दुपारी ( 31 ऑगस्ट )12.44 वाजेपर्यंत 

श्रावण पौर्णिमा 2023 -  रक्षाबंधन सण साजरा करण्याचा शुभ मुहूर्त   

  • 30 ऑगस्ट 2023 रोजी भद्रा काळ सकाळी 10.58 ते रात्री 09.01 पर्यंत आहे. अशा स्थितीत भद्रा काळ संपल्यानंतर रक्षाबंधन सण साजरा केला जाऊ शकतो.   

  • 31 ऑगस्ट 2023 रोजी भद्रा काळ नाहीय. या दिवशी पौर्णिमा तिथी सकाळी 07.05 मिनिटांपर्यंत राहील. अशा स्थितीत पहाटे 05:42 ते सकाळी 07.05 वाजेदरम्यान रक्षाबंधन सण साजरा करणे शुभ राहील.

Sawan Purnima 2023
Shravan Vinayak Chaturthi 2023 : विनायक चतुर्थीची पूजा केल्याने नेमके कोणते फायदे होतात?
भद्रा काळ म्हणजे काय 

हिंदू धर्मात भद्रा काळाला अशुभ वेळ मानली जाते. त्यामुळे या वेळेत कुठलेही शुभ कार्य केले जात नाहीत. या वेळेत शुभ कार्य केल्यास त्याचे अशुभ परिणाम समोर येण्याची शक्यता असते. 

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.