Janmashtami 2024 : श्रावणात सणांची मोठी रेलचेल पाहायला मिळते. नुकताच नारळी पौर्णिमेचा अन् रक्षाबंधनाचा सण मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. आता सर्वांना वेध लागलेत ते श्रीकृष्ण जन्माष्टमीचे.
हिंदू धर्मामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीला विशेष महत्व आहे. भगवान विष्णूंचा आठवा अवतार म्हणून श्रीकृष्णाला पुजले जाते. या दिवशी श्रीकृष्णाची पूजा आणि उपवास केला जातो. भारतात श्रीकृष्ण जन्माष्टमीचे आणि गोपाळकाल्याचे खास महत्व आहे. ही गोकुळाष्टमी देशभरात विविध नावांनी साजरी केली जाते. या सणाला विविध प्रकारच्या परंपरा देखील लाभल्या आहेत.