आठवड्याची सुरूवात सोमवाराने होते. सोमवार हा भगवान शंकरांचा वार आहे. या दिवशी अनेक भक्त महादेवांच्या मंदिरात गर्दी करतात. शनीची साडेसाती, कुंडलीतील अनेक दोष दूर करण्याची ताकद महादेवांमध्ये आहे. त्यामुळे, आजच्या दिवशी महादेवांना अभिषेक घालतात.
आजच्या दिवशी महादेवांची पूजा केल्याने घरात सुख,समृद्धी आणि समृद्धी येते. यासोबतच सर्व मनोकामना पूर्ण होतात. तुमच्या आयुष्यातील समस्या कमी होण्याची चिन्हे दिसत नसतील तर सोमवारी काही उपाय करा. या उपायांनी तुम्हाला तुमच्या समस्यांचे समाधान नक्कीच मिळेल.