Soul Rebirth : 'या' कारणांमुळे आत्मा घेतो पुनर्जन्म; काय आहे कारण?

पौराणिक वेद यजुर्वेदातील शतपथ ब्राह्मणात मृत्यूनंतर आत्म्याच्या पुनर्जन्माचे तपशीलवार वर्णन केले गेले आहे.
Soul Rebirth
Soul Rebirth Sakal
Updated on

Soul Rebirth Fact And Reason : जो व्यक्ती जन्माला येतो त्याचा मृत्यू अटळ आहे. मात्र, अनेकदा आपण मृत्यू आणि पुनर्जन्म याबद्दल ऐकतो. पण खरोखरच मृत्यूनंतर आत्म्याचा पुनर्जन्म असतो का? आणि सर्व आत्मे पुनर्जन्म घेतात का? असा प्रश्न अनेकांना पडतो.

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

Soul Rebirth
'गांधी घराणं आणि काँग्रेस समजायला मोदी-शहांना पुनर्जन्म घ्यावा लागेल'

वेद आणि पुराण पुनर्जन्माबद्दल काय सांगतात?

  • पौराणिक वेद यजुर्वेदातील शतपथ ब्राह्मणात मृत्यूनंतर आत्म्याच्या पुनर्जन्माचे तपशीलवार वर्णन केले गेले आहे.

  • उपनिषदांमध्ये असेही म्हटले आहे की, एका क्षणापेक्षा कमी किंवा जास्तीत जास्त 30 सेकंदात आत्मा शरीर सोडतो आणि दुसरे शरीर धारण करतो.

  • मृत्यूनंतर आत्म्याला नवीन शरीर धारण करण्यासाठी 3 दिवस, 13 दिवस, एक महिना किंवा एक चतुर्थांश वर्ष लागतात. जे आत्मे नवीन शरीर धारण करत नाहीत ते पितृलोक आणि स्वर्गलोकात जातात किंवा भटकतात असे गरुड पुराणात म्हटले आहे.

Soul Rebirth
तुम्ही एखाद्या फळबागेने पुनर्जन्म घेतल्याचं पाहिलंय? शिर्डीत घडलं हे

या कारणांमुळे होतो आत्म्याचा पुनर्जन्म

बदला घेण्यासाठी : ज्या व्यक्तीवर जीवनात खूप अन्याय झाला आहे आणि त्याचा मृत्यू झाला असले तर बदला घेण्यासाठी आत्मा पुनर्जन्म घेतो.

अकाली मृत्यू : अपघात किंवा कोणत्याही आपत्तीमुळे एखाद्याचा अकाली मृत्यू झाला तर अशा व्यक्तीच्या काही इच्छा अपूर्ण राहतात . असे आत्मेही आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मृत्यूनंतर पुनर्जन्म घेतात.

पुण्य कर्माचा आनंद घेण्यासाठी : जी व्यक्ती आपल्या जीवनात नेहमी चांगले कर्म करते, त्यांचा आत्मादेखील मृत्यूनंतर पुनर्जन्म घेतो. असे आत्मे पुण्य फळ भोगण्यासाठी जन्म घेतात.

डिस्ल्केमर : वरील माहिती केवळ सामान्य माहितीवर आधारित आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टीला पाठिंबा देत नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.