Spiritual Science : विज्ञानाने आज सिद्ध होणाऱ्या या गोष्टी श्रीकृष्णाने सांगून ठेवल्या होत्या आधीच

आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या घटनांविषयी, निसर्गात होणाऱ्या परिवर्तनाविषयी आपल्याला उत्सुकता असते.
Spiritual Science
Spiritual Scienceesakal
Updated on

श्रुती आपटे

Spiritual Science : आपल्याला अनेक गोष्टींविषयी कुतुहल असतं. मग ते शांत करण्यासाठी आपण त्याच्या मुळाशी पोहचण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी विज्ञानाचा आधार घेतो. विज्ञानाने ते सिद्ध करून दाखवतो. पण तुम्हाला माहिती आहे का? की, जे आज आपण नव्याने सिद्धांत मांडून सिद्ध करत असल्याचं म्हणते ते खरंतर श्रीकृष्णाने हजारो वर्ष आधी भगवत् गीतेत सांगून ठेवलं आहे.

मी आपल्या अव्यक्त रूपाने हे सर्व जग व्यापले आहे. माझ्या ठिकाणी सर्व भूतमात्र आहेत. मी मात्र त्यांच्यावर अधिष्ठित नाही.

ईश्वर सर्वव्यापी आणि अव्यक्त आहे. चराचरसृष्टी परमेश्वराने निर्माण केली आहे. ती त्याची लीला आहे. परब्रह्मला वाटले, की ‘एकोऽहं बहुस्याम् प्रजायेय’ म्हणजे मी एकटाच आहे; मी अनेकरूप होईन. ही इच्छा म्हणजेच प्रकृती. हाच परमात्म्याचा संकल्प. परमात्म्याच्या अध्यक्षतेखाली प्रकृती सृष्टीचा पसारा मांडते. ठराविक काळानंतर तो उचलून नाहीसा करते.

जणू लहान मुलांनी भातुकलीचा खेळ मांडावा आणि मन भरल्यावर तो मांडलेला डाव सहज उचलून पोतडीत भरून ठेवावा, इतक्या सहजपणे प्रकृती आणि परमेश्वराचा खेळ सुरू राहतो. योग सामर्थ्याने आपले स्वरूप अव्यक्त ठेवून मी व्यक्तरूपात प्रगट होतो. श्रीकृष्ण म्हणतो, ‘‘हे सर्व विश्व माझाच विस्तार आहे.

Spiritual Science
Spiritual Importance Of AUM : ओमकाराने साधते सर्वाधिक एकाग्रता, गितेत कृष्णाने सांगितले...

दुधाचे दही होते किंवा बिजाचे वृक्षात रूपांतर होते, तसे माझे अव्यक्त स्वरूप चराचरातून व्यक्त होते. आकाशात वायू सगळीकडे असतो, तशी भूतमात्रे माझ्यामध्ये वास करतात. मी त्यांच्या आधारावर राहत नाही. समुद्रामध्ये लाटा उसळतात त्या समुद्रावर आधारलेल्या असतात. लाटा नसल्या तरी समुद्र असतोच. कल्प म्हणजे ब्रह्मदेवाचा दिवस.

कल्पाच्या शेवटी सर्व चराचर सृष्टी माझ्या प्रकृतीत लय पावते. आणि कल्पाच्या आरंभी मीच पुन्हा त्यांना उत्पन्न करतो. या प्रकृतीच्या माध्यमातून ही सृष्टी रचली असताना त्या कर्माविषयी मी उदासीन, तटस्थ आणि निरासक्त असतो. त्यामुळे त्या कर्माचे मला बंधन लागत नाही. या सर्व घडामोडींमुळेच जगामध्ये सतत परिवर्तन होत असते. हेच माझ्या योगसामर्थ्याचे ऐश्वर्य आहे.’’

Spiritual Science
Spiritual Facts : कर्मकांड नव्हे तर स्वतःच्या शरीरात राहणाऱ्या आत्म्याला ओळखणे म्हणजे अध्यात्म

सृष्टीची निर्मिती

आपण सर्वजण या विश्वाचा एक घटक आहोत. आपण मनुष्य आहोत. आपल्याकडे बुद्धीचे सामर्थ्य आहे. त्यामुळे आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या घटनांविषयी, निसर्गात होणाऱ्या परिवर्तनाविषयी आपल्याला उत्सुकता असते. एखादा विशाल वृक्ष पाहिल्यावर आपण आश्चर्यचकित होतो. हा कसा निर्माण झाला असेल याविषयी जाणून घेण्याची तीव्र इच्छा होते. मग ६०-७० वर्षांपूर्वी एक छोटी बी मातीत रुजली असेल, मग अंकुर, छोटेसे रोपटे, एक छोटे झाड, मग प्रचंड विस्तारलेला वृक्ष आपल्यासमोर उभा राहतो. तशीच आज ही चराचरसृष्टी आपल्या डोळ्यासमोर उभी आहे आणि तिच्या निर्मितीचे रहस्य भगवान श्रीकृष्ण सांगत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.