Superstition In India : भूतंखेतं नव्हे; तर 'हे' होतं लिंबू मिरची लावण्यामागचं शास्त्रीय कारण

नवीन गाडी, दुकान, घरांच्या दारावर बऱ्याच ठिकाणी आपण लिंबू मिरची, काळी बाहुली टांगलेली बघतो. यामागचं नेमकं कारण जाणून घ्या.
Superstition In India
Superstition In Indiaesakal
Updated on

Superstition In India : नवीन गाडी, दुकान, घरांच्या दारावर बऱ्याच ठिकाणी आपण लिंबू मिरची, काळी बाहुली टांगलेली बघतो. वर अजून लिहिलेलं असतं, बुरी नजरवाले तेरा मूह काला. बऱ्याचदा असे लिंबू मिरची चौकात, रस्त्यात पडलेले असते. लोकं अगदी गाडीचं हँडल वाकडं तिकडं करून त्याच्या वरून गाडी जाऊ नये असा प्रयत्न करतात. चुकून त्यावरून चाक गेलं किंवा चालताना ते ओलांडलं गेलं तर जी काही बाधा उतरवून टाकली आहे ती आपल्या मागे लागेल... अशा बऱ्याच अंधश्रध्दा या वस्तू भोवती जोडलेल्या असतात.

पण सोशल इंफ्लूएन्सर इंस्टाग्रामवर नाव द सायबर झील यांनी या मागचं शास्त्रीय कारण सांगितलं आहे. ते म्हणतात जूने लोक याचा वापर वाईट नजर, भूताखेतांपासून वाचण्यासाठी करत नसून तप त्या मागे शास्त्रीय आणि लॉजिकल कारणं आहेत. तर जाणून घेऊया काय आहेत ही कारणं...

Superstition In India
Astro Tips Related to Spices: सावधान ! तुमच्या घरातले मसाले ठरवतात तुमच्या ग्रहांची स्थिती
Superstition In India
Superstition In India esakal

नेमकं काय टांगलं जातं?

लिंबू, मिरची, कोळसा आणि एखादा धार किंवा टोकदार दगड हे सगळं एकाच धाग्यात बांधून टांगलं जातं.

कधी सुरू झाली प्रथा?

प्रथा बऱ्याच वर्षांपूर्वी जेव्हा वीज, चप्पल आणि कार, गाड्या यांचा शोध लागलेला नव्हता. त्यावेळी लोक आपल्या घरावर, दुकानांवर लिंबू मिरची टांगत असे. बऱ्याचदा सोबतही घेऊन जात.

Superstition In India
Astro Tips : नामस्मरण नेमकी कोणती माळ घेऊन करावे?
Superstition In India
Superstition In India esakal

काय आहे कारण?

  • त्याकाळी लोक पायी प्रवास करत. जर दूरच्या अंतरावर जायचं असेल तर जिथेही थोडंसं पाणी मिळेल ते कोळशावर टाकून गाळून घेत. त्यामुळे पाणी शुध्द होतं.

  • पाण्यात लिंबू पिळल्याने बराच वेळ तहान-भूक लागत नाही. त्यामुळे सोबत असेल्या लिंबाला त्यात पिळून ते पाणी पित असत.

  • त्यावेळी लोक चप्पल न घालता चालत जात असताना जर त्यांना साप, विंचू चावला तर ज्या धाग्यात हे बांधलेलं असतं तोच धागा साप चावलेल्या जागी करकचून बांधला जातो. म्हणजे विष शरीरात पसरू नये.

  • तरीही जर विष शरीरात पसरलच तर त्या व्यक्तीला मिरची खायला दिली जाते. जर मिरचीची चव लागली तर एकतर साप बिनविषारी असेल किंवा विष अजून शरीरात पसरलेलं नाही. आणि नाही लागलं तर विष शरीरात पसरू लागलं आहे याचं परिक्षण होत असे.

  • जर विषारी साप आहे हे समजलं तर त्या टोकदार दगडाने जिथे साप चावला तिथली स्कीन कापून रक्त वाहू दिलं जातं. जेणे करून रक्तासोबत विषपण निघून जावं.

  • अशाप्रकारे जुने लोक लिंबू मिरचीला फर्स्टएड म्हणून वापरत असतं. पण आजकाल आपण याची अंधश्रध्दा करून जागोजागी कुठेही वापरतो.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.