Rules in Sutak Kaal : देशभरात सोमवारी दिवाळीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानंतर आज वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण होणार आहे. हे ग्रहण भारतात अंशतः दिसणार आहे. तत्पूर्वी, वेध सुरू झाले असून, या काळात काही कामं करणं टाळणं फायदेशीर ठरू शकते.
आजचे हे सूर्यग्रहण 4 तास 3 मिनिटांचे असणार असून, दुपारी 02.29 हे ग्रहण लागणार आहे. जे संध्याकाळी 06.32 वाजता समाप्त होईल. भारतात संध्याकाळी 04:22 ग्रहणाला सुरूवात होणार आहे. हे वेध सूर्यग्रहणाच्या १२ तास आधी होते. यादरम्यान काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. ते महत्त्वाचे नियम काय आहेत ते जाणून घेऊया.
या काळात करा या नियमांचे पालन
या काळात जेवण बनवले जात नाही आणि ते ग्रहणही केले जात नाही. हे नियम आजारी, वृद्ध आणि गर्भवती महिलांसाठी लागू नाहीत.
या पूर्वी जेवण तयार करण्यात आले असेल तर, त्यामध्ये तुळशीचे पान टाकावे. याशिवाय दूध, पाणी आदींमध्येही तुळशीचं पानं ठेवावं. यामुळे दूषित वातावरणाचा अन्नपदार्थांवर परिणाम होत नाही.
गर्भवती महिलांनी या काळात विशेष काळजी घ्यावी. वेधांपासून ग्रहण संपेपर्यंत गर्भवती महिलांनी घराबाहेर पडू नये तसेच पोटावर गेरू लावून ठेवावे.
वेध काळापासून ग्रहणाचा काळ संपेपर्यंत गर्भवती महिलांनी कोणत्याही प्रकारची तीक्ष्ण वस्तू वापरू नये.
वेध काळात घरातील देवांची पूजा करू नये. त्याऐवजी मानसिक जप फलदायी ठरतो. त्यामुळे अधिकाधिक जप करण्यावर भर द्यावा.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी तज्ज्ञांशी संपर्क साधा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.