Surya Grahan 2022 : या वर्षातले शेवटचे सुर्य ग्रहण 25 ऑक्टोबर मंगळवार रोजी आहे. ग्रहण म्हटल्यावर या काळात काय करावे, काय करु नये याविषयी अनेक प्रश्न उद्भवतात. ग्रहण किंवा ग्रहण काळ याला शुभ मानले जात नाही. त्यात यंदाचे सुर्यग्रहण तर ऐन दिवाळीच्या पर्वात आले आहे. त्यामुळे दिवाळी संबंधी अनेक प्रश्न मनात निर्माण झाले आहे. हे सर्व ऐकल्यानंतर जर आपल्या कानी पडले कि ग्रहण हे अत्यंत शुभ असते तर आपल्याला नक्कीच आश्चर्य वाटेल. असे खरचं असते का असा प्रश्न आपल्याला पडेल. नाशिक येथील महंत अनिकेत शास्त्री देशपांडे या ग्रहण काळाला अत्यंत शुभ काळ असे सांगतात. चला तर मग जाणून घेऊ महंत अनिकेशास्त्री या काळाला शुभ का म्हणतात अन् यातून मिळणारे फळ काय.
(Surya Grahan Solar Eclipse 2022 auspicious spiritual significance importance by Mahant Aniketshastri)
महंत अनिकेतशास्त्री सांगतात, या दिवाळीत अमावस्येला एक दुर्लभ योग जुळून आला आहे, तो म्हणजे या वर्षातील शेवटचे असणारे खंडग्रास सुर्यग्रहण. अनेक वर्षांनंतर हा योग जुळून आला आहे. हे सूर्य ग्रहण भारताबरोबरच आशियाखंड व अफ्रिका खंडात पण दिसणार आहे. या ग्रहणाच्या दिवसाच्या अनेक शंका अन् भिती मनात उत्पन्न होत असते. मात्र कोणीही मनात भिती बाळगण्याच कारण नाही. साधनेसाठी ग्रहणासारखा उत्तम मुहूर्त नाही असं शास्त्र वचन आहे. ज्या प्रमाणे शस्त्राला धार केली जाते त्या प्रमाणे ग्रहण काळात मंत्र व अनुष्ठानाला धार लावली जाते ताकद वाढवली जाते असे महंत सांगतात.
यावर उदाहरण देताना मंहत अनिकेतशास्त्री सांगतात, ज्यावेळेस आपण एखाद्या मंत्राचा जप करतो किंवा आपल्या इष्टदेवतेची उपासना करतो त्यावेळी एक जप केल्यास त्याची एक अशी गणना होते, आणि त्यानुसारच आपल्याला फळ प्राप्त होते. मात्र ग्रहण काळामध्ये जर आपण जप-तप, उपासना केली तर त्या एका संख्येचे आपल्याला 100 पट फळ प्राप्त होते, त्यामुळे या ग्रहण काळात जास्तीत जास्त प्रमाणात इष्ट देवतेची उपासना, जप-तप, नामस्मरण, पुजा, अनुष्ठान, पुनश्चरण, वाचन आदी धार्मिक तथा मन शुद्धी करणारी कर्मसिद्ध कर्मे करावी. ग्रहण काळात नदीच्या पाण्यात स्नान केल्यास अधिक लाभ होतो असेही शास्त्रीजी सांगतात.
ग्रहण काळ हा जरी शुभ मानला जात असला तरी काहींना या काळात त्रास होतो. मात्र तो त्रास काही विशिष्ट लोकांनाच होतो. ते आपण जाणून घेऊ. धर्म शास्त्रात ग्रहणाचे काही नियम सांगितले आहे. यात ग्रहण काळात सात्विक आहार ठेवणे, आचरण शुद्ध ठेवणे, अशुभ विचार मनात न ठेवणे, झोपी न जाणे असे नियम सांगितले जातात. जे लोक या नियमांचे पालन करणार नाहीत त्यांना मात्र ग्रहण काळाचा त्रास होईल. एकुणच काय तर या ग्रहण काळात जो जसे कर्म करेल तसे त्याला 100 पटीने फळ मिळेल, मग ते चांगले कर्म असो कि वाईट कर्म असे महंत देशपांडे सांगतात...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.