Swaminarayan Sampraday History In Marathi : स्वामी नारायण संप्रदायाचा इतिहास फार जूना आहे. या संप्रदायाला पहिले उद्धव संप्रदायाच्या नावाने ओळखले जात असे. स्वामीनारायण उर्फ नीलकंठ वर्णी यांना स्वामीनारायण संप्रदायाचे जनक किंवा संस्थापक मानलं जातं.
या संप्रदायाचे प्रवर्तक नीलकंठ वर्णी उर्फ सहजानंदजी यांचा जन्म उत्तरप्रदेशच्या गोंडा जिल्ह्यातल्या छपिया नावच्या गावात झाला. सध्या या गावाला स्वामीनारायण छपिया नावाने ओळखलं जाते.
या संप्रदायाशी आजवर लाखोंच्या संख्येने लोक जोडले जातात. नीलकंठी वर्णी यांनी ६ मंदिरांची स्थापना केली. मुख्य मंदिर त्यांचे जन्मस्थान गोंडा छपिया इथे आहे.
स्वामीनारायण संप्रदायाचे मुख्य मंदिरं
1. स्वामीनारायण मंदिर छपिया, गोंडा।
2. स्वामीनारायण मंदिर भुज, गुजरात।
3. स्वामीनारायण मंदिर अहमदाबाद गुजरात।
4. स्वामीनारायण मंदिर,धोलका।
5. स्वामीनारायण मंदिर,धोलेरा।
6. स्वामीनारायण मंदिर,जूनागढ़।
7. स्वामीनारायण मंदिर,जेतलपुर।
8. स्वामीनारायण मंदिर,मुली।
9. स्वामीनारायण मंदिर,गढ़डा।
10. स्वामीनारायण मंदिर, वड़ताल।
कोण होते स्वामीनारायण?
नीलकंठ वर्णी अथवा स्वामीनारायण यांचा जन्म उत्तरप्रदेशात झाला. त्यांच्या जन्मानंतर ज्योतिष्यांनी बघितलं की त्यांच्या हातावर आणि पायावर वज्र उर्धव रेषा आणि कमळाचे फुलाचे निशाण आहे. यावेळी भविष्यवाणी झाली की, हे मुल सामन्य नाही. येणाऱ्या काळात करोडो लोकांच्या जीवनात हे परीवर्तन घडवून आणतील.
त्यांचा जन्म उत्तरप्रदेशच्या ब्राह्मण परिवारात झाला. त्यांच खरं नाव घनश्याम पांडे होतं. वयाच्या ५ वर्षापासून शिक्षण सुरू झाले होते. ११ वर्षी मूंज झाली. त्यांना लहानपणापासून शास्त्र अध्ययनात आवड होती. त्यांनी वयाच्या ११ वर्षीच मुख्य़ शास्त्रांचा अभ्यास केला. लहान वयातच आई-वडिलांचे निधन झाले.
असं सांगितलं जातं की, त्यानंतर भावाशी काही कारणाने भांडण झालं आणि ते विरक्त झालेत. त्यांनी घर सोडले वर ते भारत दर्शनाला निघाले. ही यात्रा पूर्ण केल्यावर त्यांनी शेवटच्या काळात स्वामीनारायण संप्रदायाची स्थापना केली.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.