shravan 2022: सध्या श्रावण महिना सुरू झालाय. हा महिना प्रामुख्याने भगवान शिवशंकराला समर्पित केला जातो. भगवान शिवची आराधना केली जाते.जगप्रसिद्ध असलेल्या १२ ज्योतिर्लिंग असलेल्या ठिकाणी या महिन्यात प्रचंड गर्दी असते. या १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे नाशिकपासून केवळ २९ किमीवर आहे. (Trimbakeshwar Jyotirling)
या ज्योतिर्लिंगासंदर्भात अनेक आख्यायिका आहे. त्यातली एक आख्यायिकानुसार येथील शिवलिंग स्वतः प्रकट झाले होते. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे मंदिर गोदावरी नदीच्या काठावर आहे. चला तर या त्र्यंबकेश्वर मंदिराशी काही खास गोष्टी जाणून घेऊया. (Trimbakeshwar Jyotirling itself had appeared read mythology story)
येथे प्रचलित असलेल्या आख्यायिकेनुसार, प्राचीन काळी ब्रह्मगिरी पर्वतावर देवी अहिल्येचे पती ऋषी गौतम यांनी वास्तव्य करून तपश्चर्या केली होती. या परिसरात असे अनेक ऋषी होते जे गौतम ऋषींचा हेवा करत होते आणि त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न करत होते. एकदा सर्व ऋषींनी गौतम ऋषींवर गायींच्या हत्येचा आरोप केला.
या हत्येच्या पापाचे प्रायश्चित्त करण्यासाठी गंगा देवीला येथे आणावे लागेल, असे सर्वांनी सांगितले. त्यानंतर गौतम ऋषींनी त्या ठिकाणी शिवलिंगाची स्थापना करून पूजा सुरू केली. गौतम ऋषींच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान शिव आणि माता पार्वती तेथे प्रकट झाले. देवाकडे वरदान मागायला सांगितले. तेव्हा गौतम ऋषींनी गंगा देवीला या ठिकाणी पाठवा, असे भगवान शिवकडे वरदान मागितले.
देवी गंगा म्हणाली की जर शिव देखील या ठिकाणी आले तर ती देखील येथेच राहील. भगवान शिवने गंगेच्या या विनंतीवरून त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या रूपात तेथे वास्तव्य करण्याचे मान्य केले आणि गंगा नदी तेथे वाहू लागली.
त्र्यंबकेश्वर मंदिर अतिशय प्राचीन आहे. मंदिराच्या आत एका छोट्या खड्ड्यात तीन लहान शिवलिंग आहेत. ही तीन शिवलिंग ब्रह्मा, विष्णू आणि शिव म्हणून ओळखली जातात. त्र्यबंकेश्वर मंदिराजवळ तीन पर्वत आहेत, जे ब्रह्मगिरी, निलगिरी आणि गंगा द्वार म्हणून ओळखले जाते.
ब्रह्मगिरी हे शिवाचे रूप मानले जाते. नीलगिरी पर्वतावर निलंबिका देवी आणि दत्तात्रेय गुरु यांचे मंदिर आहे. गंगा द्वार पर्वतावर गंगा देवीचे मंदिर आहे. मूर्तीच्या पायातून पाण्याचे थेंब थेंब थेंब पडतात, जे जवळच्या कुंडमध्ये जमा होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.