Tulsi Vastu Tips : तुळस ही भगवान विष्णुची सर्वात प्रिय आहे कारण तुळशीला माता लक्ष्मीचंं रुप म्हटले जाते. असंही म्हणतात ज्या घरी तुळशीचं रोपटं हे हिरवं असतं त्या घरात नेहमी सुख शांती असते आणि माता लक्ष्मी अशा घरात वास करते. पण माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर आणि आपल्या घरावर असण्यासाठी तुळस योग्य दिशेला असणेही गरजेचं आहे. आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत. (Vastu Tips : always plant tulsi on these direction read story )
वास्तुशास्त्रातही तुळशीच्या दिशेविषयी सांगितलंय. तुळशीचं रोपटं योग्य दिशेला असेल तर घरात सकारात्मक ऊर्जा असते आणि आर्थिक स्थितिही मजबूत होते. चला तर जाणून घेऊया तुळशीचं रोपटं कोणत्या दिशेला असावं.
खूप आधी तुळशीचं रोपटं अंगणाच्या मधोमध लावण्याची परंपरा होती. कारण तुळशीच्या रोपटाला योग्य उन, हवा, पाणी मिळू शकेल पण हल्ली कमी आकारांची घरे असल्यामुळे आणि शहरात फ्लॅट कल्चर वाढल्यामुळे तुलशीचं रोपटं कुठे लावावं ही खूप मोठी समस्या आहे. त्यामुळे अनेकदा बाल्कनीत तुळशीचं रोपटं लावलेलं आपल्याला दिसतं
तुळशीचं रोपटं नेहमी उत्तर दिशेला असावं. त्यानंतर पूर्व दिशेला धार्मिक मान्यतानुसार या दोन्ही दिशेला देवतांचा वास असल्याचे म्हटले जाते. उत्तर दिशेला धनची देवता कुबेरजी का असतात त्यामुळे तुळशीचं रोपटं उत्तर दिशेलाच लावलेलं कधीही चांगले असते.
वास्तुशास्त्रानुसार तुळशीचं रोपटं हे चुकूनही दक्षिण दिशेला लावू नये. या दिशेला पितरांचा वास असतो आणि या दिशेला तुळशीचं रोपटं लावल्यानंतर तुळस सुखते आणि माता लक्ष्मी अप्रसन्न होते. घरात अडीअडचणी वाढतात. आर्थिक, आरोग्याच्या निगडीत समस्या वाढतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.