Tulsi Vivah Aarti : तुळशीची आरती पाठ नाहीये तर नो चिंता, एका क्लिकवर जाणून घ्या

Tulsi Vivah Aarti
Tulsi Vivah Aarti esakal
Updated on

Tulsi Vivah Aarti : दीपावलीच्या उत्सवानंतर कार्तिक शुद्ध द्वादशीपासून कार्तिक पौर्णिपर्यंत तुळशी विवाह करतात. यासाठी विशेषतः सायंकाळची वेळ शुभ मानली जाते. तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशी वृंदावन सारवून स्वच्छ करतात. वृंदावनास रंग लावून त्यावर स्वस्तिक काढतात. भाविकभक्त मनोभावे पुजा करुन तुळशी अन् विष्णू/शाळीग्राम यांचा विवाह विधी पुर्ण करतात. यासह दिवाळीला केलेल्या फराळाचा नैवेद्य अन् आरती केली जाते. चला तर आपण जाणून घेऊया तुळशीच्या आरत्या.

Tulsi Vivah Aarti
Astro Tips : देवतांचे पूजन करताना 'या' चुका करु नका; अन्यथा...

तुळशीची आरती - 1

जय देव जय देवी जय माये तुळशी ।

निज पत्राहुनि लघुतर त्रिभुवन हे तुळशी ॥ धृ. ॥

ब्रह्मा केवळ मूळीं मध्ये तो शौरी ।

अग्रीं शंकर तीर्थे शाखापरिवारीं ॥

सेवा करिती भावें सकळहि नरनारी ।

दर्शनमात्रें पापें हरती निर्धारी ॥ जय देवी. ॥ १ ॥

शीतल छाया भूतल व्यापक तूं कैसी ।

मंजिरिची बहु आवड कमलारमणासी ।

सर्व दलविरहित विष्णू राहे उपवासी ।

विशेष महिमा तुझा शुभ कार्तिकमासी ॥ जय देवी. ॥ २ ॥

अच्युत माधव केशव पीतांबरधारी ।

तुझे पूजनकालीं जो हें उच्चारी ॥

त्यासी देसी संतति संपत्ति सुखकारी ।

गोसावीसुत विनवी मजला तूं तारी ॥ ३ ॥

Tulsi Vivah Aarti
Astro Tips : चपाती बनवताना करू नका या चुका?; नाहीतर भोगावे लागणार वाईट परिणाम!

तुळशीची आरती - 2

तुळसीमळमृत्तिका जो लावी भाळीं ।

अनुदिनी तुळसी तीर्थी करितो आंघोळि ॥

तुळसीकाष्ठीं ग्रीवा मंडित वनमाळी ।

त्याच्यासंगे राहे हरि सर्वकाळीं ॥ १ ॥

जय देवी जय देवी जय मये तुळसी ।

अक्षय मोक्षाचें निजपद भावें देसी ॥ धृ. ॥

मंजरिया हो तुझ्या वज्राच्या धारा ।

पापाचें पर्वत जळती तनुभारा ॥

आले यमकिंकर म्हणती रविकुमरा ।

तुळसीमूळें न दिसे पापासी थारा ॥ जय. ॥ २ ॥

तुझिया एका दळे सोडविले देव ।

म्हणुनि तुझ्या चरणीं धरिला दृढ भाव ॥

वृन्दे वस्तीसी तूं मज देई ठाव ।

मुक्तेश्वर म्हणे पै मुख्य सद्भाव ॥ जय. ॥ ३ ॥

Tulsi Vivah Aarti
KITCHEN CLEANING TIPS: किचन साफ करताना 'या' 5 चुका टाळा, नाहीतर...

तुळशीची आरती ३

जय देवी तुळसी माते बहु पुण्यपावनी ।

तुज करितो आरती ही लीन पदी होउनी ॥ धृ. ॥

त्रिभुवन हें लघु आहे तव पत्राहुनि अति ।

मुळिं ब्रह्मा मध्यें शौरी राहे तो बहु प्रीतीं ॥

अग्री शंकर तीर्थे शाखापरिवारीं शोभती ।

दर्शनें तुझ्या पापे हरती गे मुळिहुनी ॥ जय. ॥ १ ॥

तव छाया शीतल दे व्यापक तूं भूतळी ।

बहु प्रीती मंजिरीची विधिजनका लागली ॥

तव दलावीण होते बहु त्यांते काहिली ।

कार्तिकी बहु आहे तव महिमा या जनीं ॥ जय. ॥ २ ॥

अच्युता माधवा हे मधुसूदना जगत्पती ।

तव पूजनीं बहु प्रेमें ऎसें जे गर्जती ।

देशी त्यां संततीही सुख सारें बहु प्रीती ।

विठ्ठलात्मज विनवि भावें मज तारी स्वामिनी ॥ जय. ॥ ३ ॥

Tulsi Vivah Aarti
Astro Tips : नोकरीत प्रगती हवी आहे? करा हे उपाय

तुळशीची आरती ४

वृंदावनवासी जय माये तुळसी ।

शिवहरिब्रह्मादीकां तूं वंद्य होसी ॥

मृत्युलोकी प्रगटुनि भक्ता उद्धरिसी ।

तुझें दर्शन होतां जळती अघराशीं ॥ १ ॥

जय देव जय देवी जय तुळसी माते ।

करिं वृद्धीं आयुध्य नारायणवनिते ॥ धृ. ॥

कार्तिकशुक्लद्वादशि कृष्णाशीं लग्न ।

तुझे वृंदावनी निशिदिनिं श्रीकृष्ण ॥

स्वर्गाहुनी वृष्टी करिती सुरगण ।

भक्त चिंतन करितां करिसी पावन ॥ जय. ॥ २ ॥

त्रिभुवनिं तुझी सेवा करिती त्रिकाळ ।

त्यांतें सुख देऊनी तारी गोपाळ ॥

तुझें स्तवन ऎकुनि कांपति कळिकाळ ।

पावन करि मज म्हणे मोरो बल्लाळ ॥ जय. ॥ ३ ॥

माहिती संकलन - अशोककाका कुलकर्णी, नाशिक

Tulsi Vivah Aarti
देवघरात चुकूनही ठेवू नका 'या' देवी-देवतांच्या मूर्ती किंवा फोटो...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.