Turmeric Water च्या या उपयांनी येईल सकारात्मकता, पैशांची तंगी होईल दूर

पुराणांनुसार हळद ही भगवान विष्णू यांना अत्यंत प्रिय होती. यासाठीच जर गुरुवारी ज्योतिष शास्त्रानुसार हळदीचे काही उपाय केले तर व्यक्तीचं नशीब उजळू शकतं
हळदीच्या पाण्याचे फायदे
हळदीच्या पाण्याचे फायदेEsakal
Updated on

हळद ही आरोग्यासाठी तर फायद्याची आहे. शिवाय हिंदू धर्मात हळदीला विशेष महत्व आहे. हिंदू धर्मात हळदीला पवित्र मानलं जात. देवाच्या पूजेसाठी कुंकवासोबत हळद तितकीच महत्वपूर्ण आहे. त्याच प्रमाणे ज्योतिष शास्त्रामध्ये देखील हळदीच्या उपयोगाचे अनेक फायदे सांगितले आहेत. turmeric water miraculous simple-measures change luck-positive effect in life

पुराणांनुसार हळद Turmeric ही भगवान विष्णू यांना अत्यंत प्रिय होती. यासाठीच जर गुरुवारी ज्योतिष शास्त्रानुसार हळदीचे काही उपाय केले तर व्यक्तीचं नशीब Fortune उजळू शकतं. कुंडलीमध्ये गुरु ग्रहाची स्थिती मजबूत करण्यासाठी देखील हळदीचा वापर लाभदायक मानला जातो. ज्योतिष शास्त्रानुसार हळदीचे काही उपाय जाणून घेऊयात. Astrological benefits turmeric 

जर तुमच्या घरामध्ये गृह क्लेश स्थिती निर्माण होतेय असं वाटत असेल तर घराच्या दारामध्ये हळदीचं पाणी थिंपडावं. असं केल्याने घरात सकारात्मकता येते. यामुळे घरातील सदस्यांमध्ये मानसिक शांती प्राप्त होते तसचं घरात सुख-समृद्धी नांदते. 

घराच्या मुख्य द्वारामध्ये हळदीचं पाणी शिंपडल्यास घरातील नकारात्मक शक्ती कुमकुवत होतात आणि घरातील कुटुंबियांवर येणारं संकट टळतं. Astrological benefits turmeric water

ज्योतिष शास्त्रानुसार घराच्या मुख्य दारात दररोज हळदीचं पाणी शिंपडल्यास घरातील वास्तू दोषांसोबतच सर्व ग्रह दोष दूर होतात. दारात हळदीचं पाणी शिंपडल्याने राहूचा दुष्प्रभाव नष्ट होईल. तसचं उत्पन्न वाढून घरात सुख-समृद्धी येते.

जर तुम्हाला अनेक दिवसांपासून पैशांच्या तंगीमुळे त्रास सहन करावा लागत असेल तर ज्योतिष शास्त्रात सांगितल्याप्रमाणे हळदीच्या पाण्यामध्ये १ रुपयाचं नाणं टाकून हे पाणी दारात शिंपडावं. त्यानंतर हे नाणं एखाद्या मंदिरात जाऊन ठेवावं. दररोज हा उपाय केल्यास लवकरच तंगी दूर होवून पैश्याचे प्रश्न सुटतील.

हे देखिल वाचा-

हळदीच्या पाण्याचे फायदे
घरातील Negativity दूर करायचीय मग या Vastu Tips तुमच्यासाठी

पूजा विधी करताना आपल्या मनगटावर किंवा गळ्याला हळदीचा छोटा टिळा लावल्याने बृहस्पती मजबूत होतो आणि वाणी देखील मजबूत होते. 

ज्योतिष शास्त्रानुसार हळदीचं दान करणं शुभ मानलं जातं. हळद दान केल्याने अनेक प्रकारच्या आजारांपासून किंवा स्वास्थ्यासंबधीच्या समस्या दूर होण्यास मदत होते आणि गुरु ग्रहाची स्थिती अनुकूल राहते. 

जर तुम्ही भगवान विष्णूची साधना करत असाल तर त्यांना लवकर प्रसन्न करण्यासाठी विष्णू मंत्राच्या जपासाठी हळदीची माळ वापरावी. 

आंघोळीच्या पाण्यात एक चिमुटभर हळद टाकल्यास तुमच्या जीवनातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यास मदत होईल. यामुळे आयुष्यात समृद्धी येते. शिवाय यातील शुद्धीकरण गुण तुमचं मनं शुद्ध करण्यासही मदत करतात. यामुळे शरीराच्या व्याधी दूर होण्यास मदत होते. 

विवाह आणि वैवाहिक जीवनासाठी हळदीचे उपाय

दर गुरुवारी श्री गणेशाला एक चिमुटभर हळद वाहिल्याने विवाहामध्ये येणाऱ्या अडचणी दूर होतील. Remedies of turmeric water 

तसंच भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेच्या फोटोमागे एक एक हळदीची पुडी ठेवल्यास लवकर विवाह योग येण्यास मदत होईल. 

जर तुमच्या वैवाहिक जीवनात अडचणी येत असतील. तुमच्या संसारावर किंवा घरावर कुणाची वक्रदृष्टी आहे असं तुम्हाला वाटत असल्यास घराच्या मुख्य दाराजवळ हळदीने स्वास्तिक तयार करावं. यामुळे तुम्हाला सुख-सौभाग्य लाभेल. 

एकूण आरोग्यासाठी उपयुक्त असलेली हळद ही तुमच्या घरातील आणि जीवनातील नकारात्मकता दूर करण्यासाठी देखील उपयुक्त ठरू शकते. ज्योतिष शास्त्रानुसार हळदीचा संबध गुरुशी असल्याने तिला पवित्र मानलं जातं. बृहस्पती देवाशी संबधीत हळद ही सौभाग्य आणि धनाच्या वृद्धीसाठी सगळ्यात उपयुक्त सामुग्री म्हणून वापरली जाते. 

टीप- ही माहिती सर्वसाधारण गृहितकांवर आधारित आहे. अंधश्रद्धेला पाठिंबा देण्याचा यात कुठलाही हेतू नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.