'कोल्हापूरसारखाच साताऱ्यात देखील साजरा होणार उदयनराजेंचा शाही दसरा; मिरवणुकीत असणार उंट-घोडे, शासनाचाही सहभाग'

कोल्हापूरच्या दसरा उत्सवाच्या (Kolhapur Dussehra Festival) धर्तीवर साताऱ्यातही शाही दसरा उत्सव साजरा होणार आहे.
Udayanraje Bhosale Satara Royal Dasara Ceremony
Udayanraje Bhosale Satara Royal Dasara Ceremonyesakal
Updated on
Summary

यंदाच्या वर्षापासून खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्यातर्फे साजरा होणाऱ्या शाही दसरा सोहळ्यामध्ये शासनाचा सहभाग असणार आहे.

सातारा : कोल्हापूरच्या दसरा उत्सवाच्या (Kolhapur Dussehra Festival) धर्तीवर साताऱ्यातही शाही दसरा उत्सव साजरा होणार आहे. या उत्सवात शासनाचाही सहभाग असणार आहे. हा उत्सव मोठ्या दिमाखात साजरा होण्यासाठी सर्व विभागांनी आपापले योगदान द्यावे, अशा सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी केल्या.

यंदाच्या वर्षापासून खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्यातर्फे साजरा होणाऱ्या शाही दसरा सोहळ्यामध्ये शासनाचा सहभाग असणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात दसरा उत्सव साजरा करण्याच्या अनुषंगाने पालकमंत्री देसाई यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

Udayanraje Bhosale Satara Royal Dasara Ceremony
Gautami Patil : नवरात्रोत्सवात गौतमी पाटीलचा जलवा; कार्यक्रमासाठी पाच हजारावर महिला उपस्थित

या वेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, पोलिस अधीक्षक समीर शेख, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, प्रांताधिकारी सुधाकर भोसले, नगर प्रशासन अधिकारी अभिजित बापट, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव, सुनील काटकर, पंकज चव्हाण आदी उपस्थित होते.

Udayanraje Bhosale Satara Royal Dasara Ceremony
Navratri Festival : कोल्हापूरची अंबाबाई आज त्र्यंबोली देवीच्या भेटीला; टेंबलाई टेकडीवर होणार कोहळा फोडण्याचा विधी

शाही दसरा मोठ्या उत्साहात साजरा होण्यासाठी प्रांताधिकारी सातारा यांना समन्वयक म्हणून नियुक्ती करावी, अशा सूचना करून पालकमंत्री देसाई म्हणाले, ‘‘जलमंदिर येथे पालखीमध्ये भवानी तलवार पूजनावेळी पोलिस बॅन्ड पथकाने मानवंदना द्यावी.

मिरवणुकीमध्ये घोडे, उंट यांचाही वापर करावा. यावर बसणाऱ्यांना मावळ्यांचा पोशाख द्यावा. पालखीसोबत समारंभाच्या पोषाखातील पोलिस पथक ठेवावेत. शासनातर्फे जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना निमंत्रित करावे.’’

दसरा शाही मिरवणूक सायंकाळी साडेपाच वाजता सुरुवात होईल. ही मिरवणूक जलमंदिर ते शिवतीर्थ अशी होईल. त्याचबरोबर शाही पोवाड्याचे आयोजन करावे. राजपथमार्ग नगरपालिकेने स्वच्छ करावा, तसेच शासकीय कार्यालय व सार्वजनिक ठिकाणी विद्युतरोषणाई करावी.

मिरवणुकीच्या प्रारंभी पोलिस पायलेटिंग ठेवावे. या वर्षीचा शाही दसरा सर्वांच्या सहभागाने उत्साहात साजरा करावाचा आहे. त्यादृष्टी जबाबदारी दिलेल्या विभागांनी योग्य ते नियोजन करावे, अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी केल्या.

Udayanraje Bhosale Satara Royal Dasara Ceremony
कोल्हापूर, हातकणंगलेतून शरद पवार हुकमी एक्के काढणार बाहेर; 'या' नेत्यांच्या नावाची जोरदार चर्चा, शेट्टींच्या अडचणी वाढणार

मिरवणुकीत घोडे, उंट असणार

जलमंदिर येथे पालखीमध्ये भवानी तलवार पूजनावेळी पोलिस बॅन्ड पथकाने मानवंदना द्यावी. मिरवणुकीमध्ये घोडे, उंट यांचाही वापर करावा. यावर बसणाऱ्यांना मावळ्यांचा पोशाख द्यावा.

पालखीसोबत समारंभाच्या पोषाखातील पोलिस पथक ठेवावेत. शासनातर्फे जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना निमंत्रित करावे, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.