Utpanna Ekadashi 2024: हिंदू धर्मात एकादशीला खास महत्व आहे. पंचांगानुसार एका वर्षात २४ एकादशी येतात. मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला उत्पन एकादशी म्हणतात. प्रत्येक एकादशीप्रमाणे या एकादशीलाही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची मनोभावे पूजा केली जाते.
आयुष्यातील सर्व समस्या दूर होतात. असे मानले जाते की या दिवशी दान केल्याने व्यक्तीला अन्न आणि पैशाची कमतरता भासत नाही. धार्मिक मान्यतेनुसार उत्पन एकादशीच्या दिवशी एकादशी मातेचे दर्शन झाले होते, म्हणून या एकादशीला उत्पना एकादशी असे नाव देण्यात आले. यंदा एकादशी कधी साजरी केली जाणार आहे आणि या दिवशी काय करावे आणि काय करू नये हे जाणून घेऊया.