‘त्या’ दोघांचाही छंद एकच छायाचित्र व छायाचित्रण. या वर्षी दोघांनीही आषाढीची वारी पूर्ण केली. वारीतील सात्त्विक भाव, निष्ठा, प्रेमभक्ती, परोपकार ही सर्व जीवनमूल्ये कळल्याचे ते सांगतात. वारीतील हीच मूल्ये जगभर पोचविण्याचा ध्यास त्यांनी घेतलाय. त्यातील एक वारकरी अमराठी तर दुसरी त्याची नियोजित सहचारिणी आणि तिही सातासमुद्रापारची. उत्तरखंडचा राघव पसरिचा आणि इटलीची इवा झेनेट्टीन अशी त्यांची नावे.
- शंकर टेमघरे, पुणे