Vastu Tips : निळ्या रंगाची बादली बाथरूममध्ये ठेवा,आणि मग पाहा चमत्कार

आर्थिक अडचण आणि वास्तू दोषांमुळे त्रस्त आहात? करा हा उपाय
Vastu Tips
Vastu Tips esakal
Updated on

नशीब कधी आणि कसं बदलेल हे काही सांगता येत नाही. वास्तुशास्त्राविषयी सांगायचं तर त्यात असं अनेक उपाय सांगण्यात आले आहेत, ज्याचा अवलंब केल्याने नशीब सुधारता येते.असाच एक उपाय बाथरूममध्ये ठेवलेल्या बादलीच्या रंगाशी संबंधित आहे.असं मानलं जातं की जर तुम्ही बाथरूममध्ये विशिष्ट रंगाची बादली ठेवली तर तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल होऊ लागतात. यासोबतच घरात धन-संपत्तीचे आगमनही वाढू लागते. चला तर मग जाणून घेऊया घराच्या बाथरूममध्ये कोणत्या रंगाची बादली ठेवणे शुभ मानले जाते.

Vastu Tips
Vastu Tips : कबुतरांचे घरात येणं शुभ की अशुभ?

निळ्या रंगाचे फायदे

शनि-राहूच्या अशुभ प्रभावापासून मुक्ती

वास्तुशास्त्रानुसार शनि आणि राहु व्यक्तीच्या जीवनात अशुभ कार्य करत असतील तर त्याने निळ्या रंगाच्या वस्तूंचा अधिक वापर करावा. बाथरूममध्ये निळ्या रंगाची बादली आणि मग ठेवावा. या उपायाने शनि-राहूच्या अशुभ प्रभावापासून मुक्ती मिळू शकते.

Vastu Tips
Vastu Tips : मेहनत करताय पण व्यवसायात यश नाही; ही असतील कारणं

नेहमी बादलीत पाणी ठेवा

वास्तुमध्ये सांगितले आहे की बाथरुमची बादली कधीही रिकामी ठेवू नका. त्यात नेहमी थोडे पाणी ठेवा. बादली पाण्याने भरली की घरात सुख-समृद्धीही भरलेली राहते.असं केल्याने घरात पैशाचा नवीन स्रोत येत राहतो.

Vastu Tips
Vastu Tips : आर्थिक त्रासाला कंटाळले आहात? शनिवारी सुपारीचे 'हे' सोपे उपाय करा

डोळ्यासाठी फायदेशीर रंग

निळ्या बादलीचा एक फायदा म्हणजे तो नैसर्गिक रंग आहे आणि हा रंग डोळ्यांना डंक देत नाही. अशा परिस्थितीत जर तुम्ही बाथरूममध्ये निळ्या रंगाची बादली वापरत असाल तर त्यामुळे डोळ्यांची दृष्टीही वाढते आणि तुम्ही तंदुरुस्त राहता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.