Vastu Tips : घरात सतत भांडण होतात? 'हे' उपाय नक्की करा
Vastu Tips : काही घरांमध्ये सतत वाद होत असतात. प्रत्येक जण घरात शांततेची अपेक्षा करत असतात. आपण रात्रंदिवस त्यासाठी प्रयत्न करतो. परंतु बर्याच वेळा असे दिसून येते की सर्व सोयीसुवीधी असूनही घरात शांतता नसते. लहान मोठ्यांचा आदर करत नाहीत तर मोठ्यांना लहानांच्या गोष्टी समजत नाहीत. अशा परिस्थितीत प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टीवर भांडणे होतात. यामुळे घराची शांती भंग होते. कधीकधी मानसिक समस्या देखील उद्भवतात. वास्तूच्या या उपायांनी ही समस्या सोडविली जाऊ शकते.
पती आणि पत्नीमध्ये वाद
वास्तूशास्त्रानुसार, जर पती-पत्नी मध्ये विवाद असेल तर हे वास्तू दोषाचे लक्षण आहे. यातून मुक्ती मिळवण्यासाठी बेडरूमच्या रंगाची काळजी घेतली पाहिजे. बेडरूमचा रंग कधीही गडद असू नये. हलका रंग असला पाहिजे. असे म्हटले जाते की, हलके रंग परस्पर प्रेम आणि सामंजस्य वाढवते.
घरातील सदस्यांनी सतर्क व्हा
घरातील प्रत्येक लहान-सहान गोष्टीत सदस्यांमध्ये भांडणे होत असतील तर सतर्क होणे आवश्यक आहे. त्वरित वास्तू दोषाचे निवारण करणे महत्वाचे आहे. यासाठी प्रथम घरातील बेडरूमची दिशा तपासा. चुकीच्या दिशेला बेडरूम असणे अनावश्यक वादाला कारणीभुत असते. वैवाहिक जोडप्याचे बेडरूम नेहमीच नैऋत्य दिशेने असावे.
खर्चासंबंधी भांडण
वास्तूशास्त्रानुसार घरात आर्थिक विषयांवरून वाद असल्यास. खर्चासाठी किंवा व्यवहारांसाठी तुम्हाला तिजोरीची दिशा बदलणे आवश्यक आहे. तिजोरी नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला असली पाहिजे. चुकीच्या दिशेने असलेली तिजोरी संपत्तीशी संबंधित वादाला आमंत्रण देते.
आपुलकीचा अभाव
एखाद्याच्या घरात अनावश्यक वाद चालू असल्यास किंवा कुटुंबातील सदस्यांमध्ये एकमेकांबद्दल आपुलकीचा अभाव असेल तर ते देखील वास्तूदोषामुळे होते. म्हणून, रात्री झोपायच्या आधी पितळेच्या भांड्यात तूपात भिजवलेला कपूर जाळा. असे म्हणतात की यामुळे वादाच्या या समस्येपासून आराम मिळतो.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.